ना. आशुतोष काळेंच्या वाढदिवसानिमित्त संवत्सर विद्यालयात शालेय वस्तूचे वाटप

ना. आशुतोष काळेंच्या वाढदिवसानिमित्त संवत्सर विद्यालयात शालेय वस्तूचे वाटप

no Distribution of school supplies in Sanvatsar Vidyalaya on the occasion of Ashutosh Kale birthday

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Thu 4 Aug, 16.30
By
राजेंद्र सालकर

कोपरगाव : जनता इंग्लिश स्कूल संवत्सर या ठिकाणी रयत शिक्षण संस्था, सातारा,उत्तर विभाग सल्लागार मंडळाचे विभागीय अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त व्हाईस चेअरमन दिलीप बोरनारे पा. यांच्या वतीने विद्यालयातील गरजू, हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचे वाटप करण्यात आले. त्यांनी आपल्या मनोगतात कै. कर्मवीर शंकरराव काळे यांच्या विचारांचा वारसा  ना आशुतोष काळे अखंडपणे पुढे नेत असून त्यातून सामाजिक विकास साधण्यासाठी ते कटीबद्ध आहेत असे सांगून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

  कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत भगवान शिंदे यांनी केले.

मुख्याध्यापक रमेश मोरे यांनी स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करून या कार्यक्रमानिमित्त विद्यार्थ्यांना केलेल्या  मदतीचा त्यांच्या शैक्षणिक विकासात वाढ होईल असे सांगून सर्वांचे ऋण व्यक्त केले.  ॲड. शिरीषकुमार लोहकणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच रन फॉर हेल्थ या स्पर्धतील विद्यालयातील द्वितीय विजेती कु आश्विनी नेहे, तृप्ती आचारी, आशा रानोडे, शितल पगारे यांचे कौतुक व सत्कार करून अभिनंदन केले.

याप्रसंगी माजी व्हाईस चेअरमन बाळासाहेब बारहाते पा., माजी व्हाईस चेअरमन उद्धव बोरावके पा., विजयराव भोसले, अशोकराव बोरनारे, सुनिल कुहिले, भानुदास म्हस्के, बाबासाहेब कासार, तुषार बारहाते, बाळासाहेब जगताप, पांडुरंग भोसले, अविनाश ससाणे, गुलाब शेख, महेश काळे, शिवाजीराव बोरनारे, दिपक वालझाडे, लक्ष्मणराव निरगुडे, अखिलेश भाकरे, राजेंद्र भाकरे, बाळासाहेब भारुड, भानुदास निकम तसेच अनेक ग्रामस्थ, विद्यालयाचे सेवकवृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते.  

कार्यक्रमाचे आभार पर्यवेक्षक  शरद आंबिलवादे यांनी मानले व सूत्रसंचालन  सुनिल वाघमारे यांनी केले. 

Leave a Reply

You cannot copy content of this page