मैदानी स्पर्धांना प्रोत्साहन देणे काळाची गरज – ना.आशुतोष काळे

मैदानी स्पर्धांना प्रोत्साहन देणे काळाची गरज – ना.आशुतोष काळे

Promotion of outdoor competitions is the need of the hour – N. Ashutosh Kale

मॅरेथॉन स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद A spontaneous response to the marathon competition

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Thu 4 Aug, 16.10
By
राजेंद्र सालकर

कोपरगाव : मागील दोन वर्ष जीवघेणी कोरोना महामारी होती. मोठ्या संख्येने एकत्र येण्यासाठी कायद्याने बंधन असल्यामुळे मॅरेथॉन स्पर्धा होवू शकल्या नाही. त्यामुळे नेहमी मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेणारे स्पर्धक आपले कौशल्य दाखवू शकले नाही. मात्र मागील काही महिन्यांपासून कोरोनाचा प्रभाव कमी होऊन अनेक निर्बंध मागे घेण्यात आले आहेत. त्यामुळे प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर मॅरेथॉन स्पर्धा होत असून स्पर्धा होत आहे. स्पर्धेतील स्पर्धकांच्या चेहऱ्यावरील आनंद समाधान देणारा असून अशा प्रकारच्या मैदानी स्पर्धांना प्रोत्साहन देणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी केले आहे.

मॅरेथॉन स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करताना नामदार आशुतोष काळे

ना. आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कोपरगावात गुरुवार (दि.०४) रोजी भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विविध वयोगटात हजारो स्पर्धकांनी भाग घेतला होता. स्पर्धकांना ना. आशुतोष काळे  यांनी शुभेच्छा दिल्या.त्यांच्या हस्ते तिरंगा ध्वज दाखवत स्पर्धेस प्रारंभ करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणले की, सध्या सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी घवघवीत यश संपादन करून आजपर्यंत ५ सुवर्ण, ५ रौप्य व ४ कास्य अशा एकूण १४ पदकांची कमाई केली आहे. यामध्ये राज्यातील खेळाडूंचा देखील समावेश असून त्यांनी देखील पदक पटकाविले ही आपल्या साठी अभिमानास्पद बाब आहे. या खेळाडूंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून  स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांनी देखील भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मेहनत घ्यावी.

आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले कौशल्य दाखवून यश मिळवावे व आपल्या देशाची मान उंचवावी असा मौलिक सल्ला दिला. भविष्यात देखील मॅरेथॉन स्पर्धेप्रमाणेच इतरही मैदानी स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करून स्पर्धा भरविण्यासाठी खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही नामदार आशुतोष काळे यांनी यावेळी दिली.

यावेळी स्पर्धेत सहभागी झालेल्या विविध गटातील विजेत्या स्पर्धकांना त्यांच्या हस्ते रोख पारितोषिक देवून गौरव करण्यात करण्यात आला.   यावेळी सौ. स्नेहलता शिंदे, ग्रामीण पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, शहर पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, शहराध्यक्ष सुनील गंगूले, महिला शहराध्यक्षा सौ. प्रतिभा शिलेदार, महिला जिल्हा सचिव सौ. रेखा जगताप, युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, युवती शहराध्यक्षा सौ. माधवी वाकचौरे, विद्यार्थी शहराध्यक्ष कार्तिक सरदार आदींसह आजी माजी नगरसेवक, सर्व सेल अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.                

Leave a Reply

You cannot copy content of this page