रन फाॅर हेल्थ स्पर्धेत संजीवनीचे यश

रन फाॅर हेल्थ स्पर्धेत संजीवनीचे यश

Sanjeevan’s success in the Run for Health competition

शालेय  गटात सत्यम मगर प्रथम तर खुल्या गटात मयुर कोकाटे दुसरा Satyam Magar first in school group and Mayur Kokate second in open group

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Thu 4 Aug, 17.20
By
राजेंद्र सालकर

 

कोपरगांव: आमदार आशुतोष  काळे यांच्या वाढदिवसानिमित्ताने राष्ट्रवादी  काॅग्रेस पार्टी, कोपरगांव शहर  आयोजीत रन फाॅर हेल्थ मॅरेथाॅन- २०२२ या स्पर्धेत संजीवनी सैनिकी स्कूलच्या सत्यम भाऊसाहेब मगर याने शालेय  गटात प्रथम क्रमांक मिळवुन मोठ्या  प्रमाणात स्पर्धक असताना देखिल संजीवनीचीच विजयी पताका झळकवली.

तर याच गटात आयुश  योगेश  घेगडमल याने ४ था क्रमांक मिळविला. खुल्या गटातुन संजीवनी प्रि कॅडेट ट्रेनिंग सेंटरच्या  मयुर गोरख कोकाटेने दुसरा क्रमांक पटकाविला.
सत्यमला आमदार काळे यांचे हस्ते रोख रूपये ५००० सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र देवुन गौरविण्यात आले, तर  आयुषला  सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र व रोख रूपये २००० चे बक्षिस देवुन गौरविण्यात आले. खुल्या गटातील द्वीतिय पुरस्कार विजेता मयुरला रोख बक्षिस रूपये ४०००, सन्मानचिन्ह, प्रामणपत्र देवुन गौरविण्यात आले. शालेय  गटातील स्पर्धा ५ किलोमीटरची होती तर खुल्या गटातील स्पर्धा ७ किलोमीटरची होती. या स्पर्धा कोपरगाव  मध्ये घेण्यात आल्या. संजीवनी मध्ये क्रीडा क्षेत्राला विशेष  महत्व दिल्या जात असल्यामुळेच आम्ही या स्पर्धांमध्ये यश  संपादन करू शकलो, अशी या विजेत्यांनी प्रतिक्रिया दिली.
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  अध्यक्ष श्री नितीनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे, विश्वस्त  श्री सुमित कोल्हे यांनी या विजेत्यांचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छाही दिल्या.

Leave a Reply

You cannot copy content of this page