अंजनापूरचे कोल्हे गटाचे आजी माजी सरपंचासह असंख्य कार्यकर्ते राष्ट्रवादीत

अंजनापूरचे कोल्हे गटाचे आजी माजी सरपंचासह असंख्य कार्यकर्ते राष्ट्रवादीत

Grandmother of Anjanapur Kolhe group, former sarpanch and many activists in NCP

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Thu 4 Aug, 17.30
By
राजेंद्र सालकर

कोपरगाव : तालुक्यातील अंजनापूर येथील कोल्हे गटाचे आजी माजी सरपंचासह  असंख्य कार्यकर्त्यांनी श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

यामध्ये सरपंच सौ. कविता गव्हाणे, अशोक गव्हाणे, बाबासाहेब गव्हाणे, काशिनाथ गव्हाणे, नानासाहेब गव्हाणे, कृष्णा गव्हाणे,अशोक गव्हाणे, एकनाथ गव्हाणे, खंडेराव गाडे, महेश गव्हाणे, भारत गव्हाणे, महेश गव्हाणे, सोमनाथ गव्हाणे, दादासाहेब गव्हाणे, राजेंद्र गव्हाणे, संजय गव्हाणे, दत्तू गव्हाणे, सुजित कोल्हे, संतोष गव्हाणे, रविंद्र गव्हाणे आदींनी प्रवेश केला आहे. या सर्व कार्यकर्त्यांचे ना.आशुतोष काळे यांनी स्वागत करून शुभेच्छा दिल्या आहेत.

मागील अडीच वर्षात ना. आशुतोष काळे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून कोपरगाव मतदार संघासाठी हजारो कोटी निधी आणला आहे. त्यामुळे अडीच वर्षापूर्वीचा मतदार संघ आणि आजचा मतदार यामध्ये विकासाच्या बाबतीत अमुलाग्र बदल झाला आहे. विकासाची दूरदृष्टी असलेला नेता ना. आशुतोष काळे यांच्या रूपाने मतदार संघाला लाभला आहे. शांत, संयमी स्वभाव, प्रत्येक कार्यकर्त्याशी आपुलकीने वागणे, सर्व सामान्य कार्यकर्त्यांच्या भावना समजावून घेवून त्यांना सन्मानपूर्वक वागणूक त्यांच्याकडून मिळत आहे. त्यामुळे अशा नेतृत्वाचे मागे खंबीरपणे उभे राहून मतदार संघाचा अधिकाधिक विकास व्हावा यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करीत असल्याचे यावेळी प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी सांगितले. हा कोल्हे गटाला मोठा धक्का असून अजूनही कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत.

यावेळी जवळकेचे सरपंच बाबुराव थोरात,  निवृत्ती गव्हाणे, अंजनापूरचे माजी सरपंच ज्ञानदेव गव्हाणे, पुंजाहरी गव्हाणे, पोपट गव्हाणे, रामनाथ गव्हाणे, अविनाश गव्हाणे, शिवाजी गव्हाणे, दत्तात्रय खकाळे, ज्ञानेश्वर गव्हाणे, विजय कोटकर आदी उपस्थित होते.

 

            

 

Leave a Reply

You cannot copy content of this page