शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना राखी बांधून साजरी केली राखी पौर्णिमा
Women office bearers of Shiv Sena celebrated Rakhi Poornima by tying rakhi to the police
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue 9 Aug, 20.30
By
राजेंद्र सालकर
कोपरगाव : रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून मुंबई व कोपरगावच्या शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी नगर उत्तर उपजिल्हाप्रमुख प्रमोद लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात जाऊन वरीष्ठ पोलिस निरीक्षक वासुदेव देसले आणि इतर कर्मचाऱ्यांना राख्या बांधून हा पवित्र सण साजरा केला. पोलिस निरीक्षक देसले यांनी देखील ओवाळणी म्हणून त्यांच्या रक्षणाची जबाबदारी घेत अडचणीच्या वेळेस तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन केले.

रक्षाबंधन कार्यक्रम सोमवारी (८ ऑगस्ट ) रोजी सकाळी श्री साईबाबा यांचे दर्शन घेऊन १७५ वा हरिनाम अखंड सप्ताह या ठिकाणी भेट देऊन रामगिरी महाराज यांचे दर्शन घेतले सप्ताहाची पाहणी केली.
बहिण भावाच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. मात्र सदैव ‘ऑन ड्युटी’ आणि पोलिस कर्मचाऱ्यांना रक्षाबंधनासह इतर सण साजरा करता येत नाही. रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून उत्तर नगर जिल्हा संपर्कप्रमुख रंजना नेवाळकर, शिर्डी संपर्कप्रमुख शुभदा शिंदे, नागपूर संपर्कप्रमुख मंदाकिनी भावे, नाशिक दिंडोरी संपर्कप्रमुख गायत्री संगमेश्वर, संपर्कप्रमुख सुवर्णा खेडेकर, सौ.वेदिका कांबळे,ऊत्तरनगर उपजिल्हाप्रमुख सपना मोरे कोपरगाव महिला शहरप्रमुख राखी विसपुते यांनी कोपरगाव शहर पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना राखी बांधून अगळ्या पद्धतीने हा सण साजरा केला. शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांच्या या उपक्रमामुळे पोलिस बांधव देखील भारावून गेले.
पोलिस बांधव २४ तास समाजाचे रक्षण करतात. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राखी बांधली. यामध्ये एक वेगळी आनंदाची अनुभूती मिळाली. आपल्या शहरातील सर्व माता भगिनीचे आजपर्यंत करीत आहात तसेच रक्षण करावे, अशी ओवाळणी यावेळी मागितल्याचे रंजना नेवाळकर यांनी सांगितले.
या सर्व महिला पदाधिकाऱ्यांचा कोपरगाव शहराच्यावतीने नगर उत्तर उपजिल्हाप्रमुख प्रमोद लबडे यांच्या खर्डे बिल्डिंग येथील शहर कार्यालयात शिवसेनेच्या पदाधिका-यांनी त्यांचा छोटेखानी सत्कार केला.

यावेळी उपजिल्हाप्रमुख प्रमोद लबडे, संघटक असलम शेख, मुन्ना मन्सुरी, माजी शहरप्रमुख सनी वाघ, एसटी कामगार सेना आगार अध्यक्ष भरत मोरे, माजी नगरसेवक अनिल आव्हाड,माजी उपशहर प्रमुख गगन हाडा, ग्राहक संरक्षण कक्ष शहरप्रमुख रवी कथले, युवा सेना तालुकाप्रमुख सिद्धार्थ शेळके, संदीप आयनोर, प्रतिक मोरे आदी पदाधिकारी व शिवसैनिक हजर होते.