भारतीय डाक विभाग: महंत रामगिरी महाराजांच्या हस्ते  १७५ तिरंगा ध्वजाचे वितरण.

भारतीय डाक विभाग: महंत रामगिरी महाराजांच्या हस्ते  १७५ तिरंगा ध्वजाचे वितरण.

Indian Postal Department: Distribution of 175 Tricolor Flags by Mahant Ramgiri Maharaj.

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sun 7 Aug, 15.15
By
राजेंद्र सालकर

कोपरगांव :    भारतीय स्वातंत्राला ७५ वर्षे पुर्ण होत असल्याबददल अमृतमहोत्सवी दिनाचे औचित्य साधुन व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हर घर तिरंगा अभियानाला प्रतिसाद देत भारतीय डाक विभागाच्यावतीने श्रीक्षेत्र कोकमठाण येथे सुरू असलेल्या १७५ व्या अखंड हरिनाम सप्ताहात १७५ तिरंगा ध्वजाचे वितरण भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे व सराला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते नुकतेच करण्यांत आले.

भारत देशाला स्वातंत्र मिळविण्यासाठी येथील प्रत्येक स्वातंत्रसेनानी व सर्व ज्ञात अज्ञात घटक यांचे बलिदान कदापिही विसरता येणार नाही तेंव्हा सर्व भाविकांनी या अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन महंत रामगिरी महाराज यांनी केले. 
         
प्रारंभी श्रीरामपुर डाक विभागाचे विनायक शिंदे व शिर्डीचे पोष्टमास्तर राजेश नेतनकर यांनी आंतरराष्ट्रीय किर्तीच्या शिर्डी साईबाबा आणि गंगागिरी महाराज या दोन महान विभुतींचा अमृतमहोत्सवी स्वातंत्रदिन सोहळयाचा योगायोग जुळून आल्याचे प्रास्तविकात सांगितले.
भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष शरद थोरात यांनी तिरंगा ध्वज अभियानाची माहिती दिली. बाजार समितीचे माजी सभापती संभाजी रक्ताटे म्हणाले की, हरिनाम सप्ताहाचे नामस्मरण आणि देशभक्ती हे मोठे भावविश्व असुन आज प्रत्येक भारतवासियांना आपल्या तिरंगा ध्वजाचा अभिमान आहे. 
           
सौ. स्नेहलता कोल्हे पुढे म्हणाल्या की, भारतीय डाक विभाग आणि त्यांचे सर्व कर्मचारी यांनी कोरोना काळात केलेले काम कदापीही विसरता येणार नाही. देशाचा अमृतमहोत्सवी स्वातंत्र उत्सव १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान सर्वत्र साजरा होत असतांना भारतीय डाक विभागाने त्यांच्या नैमित्तीक कार्याच्या भागाबरोबरच हर घर तिरंगा ध्वज अभियानात सक्रिय सहभाग नोंदवत अगदी ग्रामिण भागातही हे ध्वज उपलब्ध करून देण्याची मोहिम पोष्ट खात्याच्यावतीने हाती घेतली ती कौतुकास्पद आहे.
       
  कोकमठाण तीर्थक्षेत्री अखंड हरिनाम सप्ताहात थेट भाविकांच्या घरा-घरात तिरंगा ध्वज गेला याचे आत्मीक समाधान आहे. याप्रसंगी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्यांचे उपाध्यक्ष रमेश घोडेराव, सर्व संचालक, अरूणराव येवले, शिवाजीराव वक्ते, बाळासाहेब वक्ते, केशवराव भवर, पोष्टाचे निरीक्षक अर्जुन मोरे, शिंगणापुर सब पोष्टमास्तर गवळी, संजय ढेपले, दत्तात्रय गायकवाड, राहुल आढाव, किशोर दिघे, राजु भागवत, सोमनाथ आहेर, बोजगे, विजय जोर्वेकर यांच्यासह श्रीरामपुर, संगमनेर, राहाता, कोपरगांव विभागातील पोष्ट खात्याचे सर्व वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. शेवटी भाजपाचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम यांनी आभार मानले.

Leave a Reply

You cannot copy content of this page