संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सव समिती जाहीर
Sanjeevani Yuva Pratishthan’s Dahi Handi Utsav Committee announced
छत्रपती शिवाजी महाराज चौकात रंगणार दहीहंडीचा थरार The thrill of Dahi Handi will be played at Chhatrapati Shivaji Maharaj Chowk
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Wed 17 Aug, 18.00
By
राजेंद्र सालकर
कोपरगाव : येथील संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज मानाची दहीहंडी उत्सव कमिटीची सन २०२२ ची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.
संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने कोपरगाव शहरातील मेन रोडवर छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर दरवर्षी दहीहंडी उत्सव भव्यदिव्य प्रमाणात साजरा करण्यात येतो. संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित दहीहंडी उत्सव हा केवळ कोपरगाव तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. “जागवूया ज्योत माणुसकीची” हे ब्रीदवाक्य असलेल्या संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि इतर उपक्रम राबविण्यात येतात. विशेष म्हणजे संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने स्वखर्चातून दरवर्षी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. या विवाह सोहळ्यात विवाहबद्ध होणाऱ्या वधू-वरांना
संसारोपयोगी साहित्य विनामूल्य भेट देऊन सौभाग्य मांगल्याचे प्रतीक सोन्याचे मणी मंगळसूत्रही दिले जाते. यापूर्वी संजीवनी युवा प्रतिष्ठानने दहीहंडीची रक्कम पूरग्रस्तांना मदत म्हणून देण्याचा अनोखा निर्णय घेतला होता. अशा प्रकारे सामाजिक आणि विधायक कार्यात अग्रेसर असलेल्या संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने सालाबादप्रमाणे यावर्षीही दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या छत्रपती शिवाजी महाराज मानाची दहीहंडी उत्सव समितीच्या सन २०२२ च्या कार्यकारिणीची नुकतीच एकमताने निवड करण्यात आली.
या दहीहंडी उत्सव समितीचे पदाधिकारी असे-अध्यक्ष-स्वराज अशोक लकारे, कार्याध्यक्ष-राहुल उत्तमराव खरात, उपाध्यक्ष- अर्जुन भगवान मरसाळे, शैलेश दीपक नागरे, सचिव-राहुल जगन्नाथ बहादुरे, दशरथ प्रीतम सरवान, समीर किसन सुपेकर, अनिल रमेश गायकवाड, सहसचिव-सचिन फिलीप दिनकर, अल्ताफ मोतीखाॅ पठाण, आकाश अंकुश शिरसे, शाम भास्कर शिंदे, संघटक-रामचंद्र नामदेव साळुंखे, सतीश कारभारी म्हस्के, विकी गोपाल परदेशी, इलियास इसलाउद्दीन शेख, खजिनदार-देविदास साहेबराव बागुल.
गुरुवारी १८ आगस्ट रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी असून, शुक्रवारी १९ आॅगस्ट रोजी गोपाळ काला आणि दहीहंडी उत्सव रंगणार आहे. दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकांसाठी अनेक आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत.
ही मानाची दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी केले आहे.
Post Views:
197