समता तिरंगा रॅली राष्ट्रप्रेमाचे बाळकडू  देणाऱ्या हर घर तिरंगा अभियानाचा सर्वोच्च बिंदु –  विजय बोरुडे

समता तिरंगा रॅली राष्ट्रप्रेमाचे बाळकडू  देणाऱ्या हर घर तिरंगा अभियानाचा सर्वोच्च बिंदु –  विजय बोरुडे

Samata Tricolor Rally is the highest point of Har Ghar Tricolor Abhiyaan which gives birth to patriotism – Vijay Borude

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue 16 Aug, 15.20
By
राजेंद्र सालकर

कोपरगाव : केंद्र सरकारने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त १३ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान राष्ट्रप्रेमाचे बाळकडू देणाऱ्या हर घर तिरंगा या अभियानातील समता तिरंगा रॅली ही सर्वोच्च बिंदू मानावा  लागेल असे  गौरवौद्गार तहसीलदार विजय बोरुडे यांनी निवारा येथे स्व.दादाप्पा खंडाप्पा कोयटे विद्यालयात ध्वजारोहण प्रसंगी व्यक्त केले.७५ फूट उंचीवरील तिरंगा  हा तर उगवत्या पिढीला दिशा देणारा राष्ट्रभक्तीचा दिपस्तंभच असल्याचेही ते म्हणाले.

प्रास्ताविकात समता परिवाराचे संस्थापक काका कोयटे यांनी सांगितले की, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त समता पतसंस्था, समता इंटरनॅशनल स्कूल, कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ आणि कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशन यांच्या वतीने १५ ऑगस्ट रोजी गांधी चौक ते निवाऱ्या पर्यंत  १ हजार १११ फूट लांबीच्या तिरंगा ध्वज खांद्यावर घेऊन  जाण्याचे ठरविले यासाठी समता स्कूलच्या मॅनेजिंग ट्रस्ट स्वाती कोयटे  यांच्या मार्गदर्शनाखाली इंटरनॅशनल स्कूलचे शिक्षक,विद्यार्थी,कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला.
या समता रॅलीस आमदार आशुतोष काळे यांनी पुष्पचक्र अर्पण करून स्वागत केले तर माजी सैनिक युवराज गांगवे यांनी या रॅलीस हिरवा झेंडा दाखविला. रॅलीचे स्वागत करण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूने दुतर्फा व्यापारी, व्यावसायिक, उद्योजक, राष्ट्रप्रेमी नागरिक यांनी तिरंगा ध्वजामध्ये झेंडू, गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या टाकून स्वागत केले. तर नारायण अग्रवाल यांनी अहिंसा स्तंभाजवळ फटाक्यांची  आतिशबाजी केली .  या रॅलीचा समारोप स्व.दादाप्पा खंडाप्पा कोयटे विद्यालय येथे करण्यात आला. 
     
प्रसंगी  आमदार आशुतोष  काळे, माजी आमदार सौ. स्नेहलता कोल्हे, कोल्हे कारखाना अध्यक्ष विवेक कोल्हे,  शहर पोलीस निरीक्षक .वासुदेव देसले,  माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे, गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष  राजेश   परजणे, सचिन सूर्यवंशी,.नामदेव ठोंबळ, परेश उदावंत, सुमित सिनगर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
या रॅलीत समता  स्कूलचे शिक्षक,विद्यार्थी, समता  पतसंस्थेचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी,  व्यापारी महासंघ , तालुका किराणा मर्चंट  सदस्य, शहरातील  नागरिक सहभागी झाले होते 
सुत्रसंचालन समता  स्कूलचे उपप्राचार्य  समीर आत्तार यांनी तर  आभार समता  संचालक  संदीप कोयटे यांनी मानले.

Leave a Reply

You cannot copy content of this page