पर्यावरणाच्या दृष्टीने ॲड. संजीव कुलकर्णी यांचे पुस्तक समाजासाठी कामधेनू ग्रंथ ठरेल-न्यायमूर्ती को-हाळे
In terms of environment Adv. Sanjeev Kulkarni’s book will become Kamdhenu Granth for society – Justice Ko-Hale
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sat 15 Oct , 18.00 pm
By राजेंद्र सालकर
कोपरगाव, :ॲड. संजीव कुलकर्णी यांचे पुस्तक पर्यावरणाच्या दृष्टीने समाजासाठी कामधेनू ग्रंथ ठरेल विनंती एवढीच आहे की इंग्रजी भाषेतील या पुस्तकाचे पुस्तकाचा अनुवाद मराठीत व्हावा त्याने ते आणखी प्रभावी ठरेल असे प्रतिपादन मा. जिल्हा न्यायाधीश- वर्ग १ एस. बी. कोऱ्हाळे यांनी येथे केले. स्थानिक के.जे. सोमैया महाविद्यालयात शनिवारी (१५) रोजी सकाळी The Earth: Beginning of the End या ग्रंथाचे प्रकाशन त्यांच्या शुभहस्ते झाले, अध्यक्षस्थानी को.ता.एज्यु.सोसाटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे हे होते
तर जिल्हा न्यायाधीश- वर्ग २ बी.एम. पाटील तसेच प्रो ( डॉ.) प्रवीण सप्तर्षी यांची प्रमुख उपस्थिती होती.
न्या. को-हाळे पुढे म्हणाले की, “जो पर्यंत आपण स्वतः हा मनावर घेत नाही तोपर्यंत पर्यावरणाचा –हास थांबणार नाही. तोपर्यंत आपण पर्यावरण रहित जीवन जगू शकत नाही. ॲड. संजीव कुलकर्णी लिखित The Earth: Beginning of the End या पर्यावरणावरील पुस्तकाची ग्रंथ म्हणून पूजा करणे व वाचणे गरजेचे आहे . सध्या पर्यावरणाचा –हास इतक्या प्रचंड प्रमाणात झालेले आहे कि, केवळ भाष्य करून चालणार नाही तर जीवनात त्याचे अनुकरण करावे लागेल पाण्यासाठी रतीब लावावे लागते आणि काचेसारखे पाणी बाटलीतून विकत घ्यावे लागते याला तुम्ही आम्ही जबाबदार आहोत त्यापाठीमागे कुठे तरी मोठे अर्थकारण व राजकारण होते की काय अशी शंका एक सामान्य नागरिक म्हणून मला वाटते.
अशोकराव रोहमारे यांनी “ॲड. संजीव कुलकर्णी यांचा हा ग्रंथ मराठीत अनुवादित होऊन शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचावा.” अशी अपेक्षा व्यक्त केली
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पर्यावरण तज्ज्ञ डॉ. प्रवीण सप्तर्षी म्हणाले की, “ज्यावेळी हत्तींच्या वनातून हत्तींना हाकलून कुंभमेळ्यासाठी जागा द्या असे आव्हान केले जाते. तेव्हा आमच्यातील पर्यावरणप्रेमींना प्रचंड दुःख होते. अशा प्रकारे अनेक वने व गायराने लुटून आपण गरीब शेतकऱ्यांच्या डेअऱ्या तोट्यात आणि पिशवीत दूध घालून विकणारे कारखाने कोट्याधीश अशी दयनीय परिस्थिती निर्माण केली. त्यामुळे ॲड. संजीव कुलकर्णी यांनी दिवसेंदिवस होत जाणाऱ्या पर्यावरण-विनाशाच्या चिंतेतून तसेच त्याच्या संरक्षणाच्या कटिबध्दतेतून हा ग्रंथ लिहिताना त्यांच्या त्यांच्यातील ज्ञानलालसा स्फूर्ती ज्ञानग्रहण व ज्ञान प्रसारण करताना सामाजिक दायित्वास कटिबद्ध राहून लिहिला व त्याच्या विक्रीतून येणारा निधी महाविद्यालयातील गरीब विध्यार्थ्यांच्या विकासासाठी वापरला जाणार असल्याचे ऐकून खूप बरे वाटले. त्यामुळे मा. जज मंडळींनी देखील हा ग्रंथ वाचावा जेणेकरून पर्यावरणासाठी लिहीणा-या व झटणाऱ्या आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना न्याय मिळेल असे मनोमन वाटते.”
यावेळी लेफ्ट. कर्नल नरैन दास म्हणाले की, “मी एक सैनिक असून मला वाचनाचाही छंद आहे. त्यामुळे मी अॅड. संजीव कुलकर्णी यांचा The Earth: Beginning of the End हा ग्रंथ पुन्हा पुन्हा वाचला तेव्हा मला जाणवले की हे पर्यावरनाशी संबंधित केवळ एक चिंतनच नसून ते एक उत्तम संशोधन देखील आहे. हा संशोधनात्मक ग्रंथ संपूर्ण मानवी जीवनात बदल घडवू शकतो आणि पर्यावरणाशी संबंधित अनेक समस्यांचा नाश करू शकतो.
” जिल्हा न्यायाधीश- वर्ग २ बी.एम. पाटील म्हणाले की, कोरोनाचे अनेक तोटे सांगितले जातात. परंतु कोरोना काळातील लॉकडाऊन मधून असा सुंदर ग्रंथ लिहिला जाऊ शकतो. ही खरोखर अभिमानाची गोष्ट आहे . मी
ॲड.संजीव कुलकर्णी यांना शुभेच्छा देतो.
याप्रसंगी आपल्या पुस्तकाविषयी मनोगत व्यक्त करतांना लेखक ॲड. संजीव कुलकर्णी म्हणाले की, “माझ्यासाठी या ग्रंथ लेखनाची प्रेरणा अधिक महत्वाची आहे. कोरोना काळातील लॉकडाऊनदरम्यान ठप्प झालेले जनजीवन व दिवसरात्र घरात बसून टीव्हीवरील त्याच त्या रुग्ण संख्या वाढीच्या व मृत्यूच्या बातम्या व घरात असल्यामुळे डोमेस्टिक व्हायलन्सच्या भीतीमुळे लिखाणाची इच्छा निर्माण झाली. अशी स्पष्ट कबुली त्यांनी यावेळी दिली वकिली हा पोटाचा व्यवसाय त्यामुळे बिगर पैशात कायद्यासंदर्भात लिहिण काही पटलं नाही आणि पर्यावरणावर लिहावंसं वाटलं म्हणून हा वेगळा विषय लिखाणासाठी घेतला असे त्यांनी सांगितले.
लेखक ॲड. संजीव कुलकर्णी म्हणतात…..
लॉक डाऊन ने पैशाशिवाय जगता येते हे शिकवलं, तर कोरोना ने पैशाचं महत्व कळलं….
ज्यू लोकांच्या काटकसरीचा किस्सा सांगताना पुण्याचे लोक त्यापेक्षा कसे भारी आहेत त्यांना कमी शब्दात अपमान कसा करायचा हे चांगलेच ठाऊक असते….
कोरोनात अनेकांना धुनी भांडी करावी लागली तसा मी पूर्वीपासूनच करत होतो पण आता धुणी भांडी नको म्हणून पुस्तक लिखाणाकडे वळालो….
कोरोनाच्या दोन वर्षात वटसावित्री पौर्णिमा झाली नसल्याने जन्मोजन्मीच्या फेऱ्यातून लाखो लोक मोकळे झाले असे म्हणताच मोठा हशा पिकला …..
या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातुन प्राचार्य डॉ. बी.एस. यादव यांनी महाविद्यालयाच्या विकासाची माहिती दिली. पाहुण्यांचा व ग्रंथाचा परिचय प्रा. डॉ. विजय ठाणगे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. डॉ. शैलेंद्र बनसोडे यांनी केले.
आभार संस्थेचे विश्वत संदीप रोहमारे यांनी मानले.
यावेळी महाविद्यालयाचा वार्षिक अंक गोदातरंग (भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विशेष अंक) चे प्रकाशन व विज्ञान मंडळाचे उदघाटन पाहुणचा हस्ते करण्यात आले. यशस्वी करण्यासाठी ॲड. प्रेरणा पटनी, रजिस्ट्रार डॉ. अभिजित नाईकवाडे, प्रोफेसर डॉ. जे.एस. मोरे आदींनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमासाठी संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे, ठोळे उद्योग समूहाचे कैलासशेठ ठोळे, भन्साळी उद्योग समूहाचे संजय भन्साळी,माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, दिलीप दारूणकर, नगरसेवक अतुल काले, जंगली महाराज आश्रम चे वसंतराव आव्हाड, कॉलेज कमिटीचे अनिल सोनवणे, सुधीर डागा, चंद्रशेखर कुलकर्णी, जवाहर शहा, ॲड . संजय भोकरे, ॲड. जयंत जोशी, ॲड. अशोक टूपके, ॲड.मिलिंद गुजराथी, ॲड. बाळासाहेब कडू, ॲड. राजेंद्र वाघ, ॲड.देव, ॲड.स्मिता जोशी ॲड. पुनम गुजराथी, आदिसह महाविद्यालया न विद्यार्थी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते