केंद्र सरकारच्या पतसंस्था प्रोत्साहन धोरणाचे आपण स्वागत करू-काका कोयटे
We will welcome the central government’s credit institution promotion policy – Kaka Koyte
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Fir 14 Oct , 18.40 pm
By राजेंद्र सालकर
By राजेंद्र सालकर
कोपरगाव- भारतात ग्रामीण बँकांपेक्षा नागरी सहकारी पतसंस्थांना चांगले दिवस येणार असल्याने सर्व सहकारी पतसंस्थांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा स्विकार करून या नव्या आव्हानाला सामोरे जाण्याची तयारी दाखविली पाहिजे. असे प्रतिपादन राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी कुंभारी येथे येथील राघवेश्वर ग्रामीण बिगर शेती व संस्थेच्या कार्यालयात “चला खेडी समृद्ध करूया” या कार्यक्रमात बोलताना केले ग्रामीण भागातील पतसंस्थांना प्रोत्साहन देण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाचे आपण स्वागत करूया असेही ते म्हणाले,
महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या प्रशिक्षण शिबिरात कायदे तज्ञ श्याम क्षीरसागर यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील कलम १४४ ची माहिती दिली. चार्टर्ड अकौंटंट दत्तात्रय खेमनर यांनी सहकार कायदा व आयकर या विषयावर व्याख्यान दिले.
राघवेश्वर पतसंस्थेचे चेअरमन गोपीनाथ नीलकंठ यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रास्ताविक सोपानराव चिने, व्हा. चेअरमन सौ.बेबीताई वारुळे यांनी केले.
यावेळी पंडितराव चांदगुडे म्हणाले साखर कारखानदारी प्रमाणेच पतसंस्था चळवळीमुळे ग्रामीण भागातील अर्थकारणाला बळकटी मिळाली
गुरुदत्त पतसंस्थेचे ज्ञानदेव मांजरे यांनी पतसंस्थांच्या निकोप वाढीसाठी कर्जदारांनी वेळेत कर्ज भरून सहकार्य करावे असे आवाहन केले.
कोपरगाव तालुक्यातील पतसंस्थांच्या वतीने एशियन कॉन्फेडरेशन ऑफ क्रेडीट युनियनचे संचालक पदी व खजिनदार पदी निवड झाल्याबद्दल काका कोयटे यांचा सत्कार राजेंद्र निवृत्ती कोळपे श्री सिद्धेश्वर पतसंस्था पंडितराव चांदगुडे गोदावरी पतसंस्था, .जयवंतराव रोहमारे (दादा शहाजी रोहमारे पतसंस्था, ज्ञानदेव मांजरेगुरुदत्त पतसंस्था आशुतोष पटवर्धन मंदावी पतसंस्था , विलासराव आव्हाड कोपरगाव ता पतसंस्था, वसंतराव आव्हाड ओमगुरुदेव पतसंस्था,. किशोर फुलफगर भाग्यलक्ष्मी पतसंस्था, आनंदा चव्हाण श्री.संत जनार्धन स्वामी पतसंस्था, राधुजी कोळपे शरद पवार पतसंस्था,सुभाष गाडे गणेश पतसंस्था, .चंद्रकांत चांदगुडे जगदंबा पतसंस्था,.राजेंद्र ढोमसे शाहाजापूर पतसंस्था,राजेंद्र बागुल संजीवनी पतसंस्था.राजेंद्र देशमुख परिसर पतसंस्था .सचिन चांदगुडे कै. जयसिंगअप्पा पतसंस्था, सौ.रोहिणी बोखारे शृंगेश्वर पतसंस्था, शांताराम कदम शिवशक्ती पतसंस्था , प्रभाकर वाणी भारतीय पतसंस्था, सुभाष गाडे श्री गणेश पतसंस्था,वसंतराव देशमुख सिद्धलक्ष्मी पतसंस्था . शंकर वाणी साईलक्ष्मी पतसंस्था , यांच्या वतीने करण्यात आला.
या सत्काराला उत्तर देताना काका कोयटे म्हणाले कि, परदेशातील पतसंस्था चळवळीतील चांगले उपक्रम महाराष्ट्रातील ग्रामीण भागात आणण्यासाठी मी प्रयत्न करणार आहोत. तसेच माझी निवड हि कोपरगाव तालुक्यातील सहकारी पतसंस्था चळवळीचा सन्मान आहे असे मी समजतो.