कर्मवीर शंकरराव काळेंच्या कार्याचा स्मृतिगंध आजही दरवळत आहे- ह.भ.प. देहूकर

कर्मवीर शंकरराव काळेंच्या कार्याचा स्मृतिगंध आजही दरवळत आहे– ह.भ.प. देहूकर

The memory of Karmaveer Shankarao Kale’s work is lingering even today- H.B.P. Carpenter

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sun6 Nov , 17.30 Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव – जन्माला येणारा प्रत्येक व्यक्तिला मरण अटळ आहे. आयुष्य किती जगलो हे आयुष्य नाही. ती व्यक्ती गेल्यानंतर त्याचे आयुष्य किती हे ठरत असते. हे शाश्वत आयुष्य किती मिळवायचे हे आपल्या हातात असते. संत ज्ञानेश्वरांना अवघे २२ वर्ष, जगद्गुरू तुकाराम महाराज ४१ वर्ष, १ महिना १७ दिवस,छत्रपती शिवाजी महराजांना ५१ वर्ष, स्वामी विवेकानंदांना ३१ वर्ष आयुष्य मिळाले मात्र आजही शेकडो वर्षांनंतर ते किर्तीरुपाणे आपल्यात आहेत. तदवत कर्मवीर शंकरराव काळे साहेब देखील आपल्या समाजकार्याने अजरामर झाले असून त्यांच्या स्मृतिगंध आजही दरवळत असल्याचे गौरवद्गार संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे १० वे वंशज ह.भ.प. बापूसाहेब महाराज देहूकर यांनी काढले.

शिक्षण,सहकार,सामाजिक व राजकीय क्षेत्रात आपल्या कार्य कर्तुत्वाचा ठसा उमटविणारे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक, माजी खासदार स्व.कर्मवीर शंकरराव काळे साहेब यांच्या १० व्या पुण्यस्मरणानिमित्त कर्मवीर शंकरराव काळे स्मृती उद्यानात आयोजित कीर्तनरूपी सेवेप्रसंगी ह.भ.प. बापूसाहेब महाराज देहूकर बोलत होते. ते पुढे म्हणाले की, कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांना स्व. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, कर्मवीर भाऊराव पाटील यांचा सहवास लाभला. शरदचंद्रजी पवार यांच्या सोबत त्यांनी काम केले. काळे परिवारावर संत वाडमयाच्या विचारांचा पगडा होता हे त्यांच्या विचारातून दिसून येते. त्यांनी माणसाला माणस जोडून उभा केलेला साखर कारखाना व उद्योग समूहामुळे परिसर समृद्ध झाला. संसारात रंजल्या, गांजल्याचे दु:ख कमी करण्याचे काम संत महात्ने करतात.साखर कारखान्याच्या उभारणीतून शेतकऱ्यांना सुखी करून त्यांच्या शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी केलेले काम संताप्रमाणेच आहे. आणि हेच काम आजही माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आ. आशुतोष काळे यांच्या रूपाने त्यांची तिसरी पिढी करीत आहे. यावरून शुद्ध बीजापोटी, फळे रसाळ गोमटी या संतवचनाची अनुभूती येत आहे. दोन पिढ्यापासून सुरु असलेले समाजकार्य तिसरी पिढी चालवित आहे हे सहसा घडत नाही मात्र ज्याप्रमाणे वाढत जाणाऱ्या अमृताच्या वेलावर अमृताचेच फळ लागते त्याप्रमाणे काळे परिवाराच्या अमृत वेलीवरील आ.आशुतोष काळे हे अमृतरुपी फळ आहे व त्यांच्या हातून देखील काळे परिवाराचा समाजकारणाचा वारसा समर्थपणे पुढे चालविला जात असल्याचे ह.भ.प. बापूसाहेब महाराज देहूकर यांनी सांगितले.यावेळी कर्मवीर शंकरराव काळे मित्रमंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवन, उपाध्यक्ष नारायणराव मांजरे, संभाजीराव काळे, बाळासाहेब कदम, पद्माकांत कुदळे, बबनराव कोळपे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष दिलीपराव बोरनारे, संचालक सुधाकर रोहोम, डॉ. मच्छिंद्रनाथ बर्डे, राजेंद्र घुमरे, सचिन चांदगुडे, श्रीराम राजेभोसले, शंकरराव चव्हाण, शिवाजीराव घुले, अशोक मवाळ, दिनार कुदळे, सुनील मांजरे, मनोज जगझाप, माजी संचालक ज्ञानदेव मांजरे, सचिन रोहमारे, मीननाथ बारगळ, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक सुनील कोल्हे,आसवणी विभागाचे जनरल  मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे, सेक्रेटरीबाबा सय्यद, असि. सेक्रेटरी एस. डी. शिरसाठ, कर्मवीर शंकरराव काळे मित्रमंडळाचे सर्व सदस्य, संलग्न संस्थांचे चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे माजी सदस्य, कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगरसेवक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Leave a Reply

You cannot copy content of this page