राष्ट्रवादीचा दणका : धारणगाव रस्त्याचे काम इस्टिमेट प्रमाणे करणार ठेकेदाराची ग्वाही
NCP’s Danaka: Contractor’s testimony that Dharangaon road will be done according to the estimate
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Mon7 Nov , 17.00 Pm
By राजेंद्र सालकर
कोपरगाव: आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरातील विविध रस्त्यांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी दिला असून या रस्त्यांचे काम आजही प्रलंबित असून काही रस्त्यांचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले आहे. त्याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांसमक्ष संबंधित ठेकेदाराची कानउघाडणी केल्यानंतर छत्रपती संभाजी महाराज स्मारक ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक रस्त्याचे काम इंस्टीमेट प्रमाणे करण्याचे संबंधित ठेकेदाराने मान्य करून रस्त्याचे काम सुरु केले आहे.
कोपरगाव शहरातील अनेक रस्त्यांच्या कामांना मागील सात ते आठ महिन्यांपासून सुरुवात करण्यात आली असली तरी आजही या रस्त्यांची कामे अद्याप अपूर्ण आहेत. त्यामुळे नागरिकांना त्रास होत असून या सर्व रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करण्यात यावी व रस्त्यांची कामे मंजूर इंस्टीमेट प्रमाणे करावी. जर रस्त्याच्या कामात हलगर्जीपणा होवून रस्त्याची कामे निकृष्ट दर्जाची होणार नाही याची काळजी घ्यावी अशा आशयाचे निवेदन आ. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नगरपरिषद अधिकारी भालचंद्र उंबरजे यांना निवेदन देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, छत्रपती संभाजी महाराज स्मारक ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक रस्ता डांबरीकरण करणे, लुंबिनी बुद्ध विहाराकडे जाणारा रस्ता डांबरीकरण करणे, छत्रपती संभाजी महाराज स्मारक ते गोकुळनगरी रस्ता डांबरीकरण करणे, श्री साईबाबा कॉर्नर ते कृषी उत्पन्न बाजार समिती यार्ड रस्ता, डी.पी. रोड मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, प्रभाग क्र. ७ व इतर सर्व प्रभागांतील अंतर्गत रस्ते आदी रस्त्यांची कामे इंस्टीमेट प्रमाणे आठ दिवसाच्या पूर्ण करावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे करण्यात येईल असा ईशारा देण्यात आला आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, विरेन बोरवके, संदीप पगारे, राजेंद्र वाकचौरे, अजीज शेख, नवाज कुरेशी, राहुल देवळालीकर, वाल्मिक लहिरे, आकाश डागा, संदीप सावतडकर, मुकुंद इंगळे, रहेमान कुरेशी, डॉ. अनिरुद्ध काळे, मनोज नरोडे, गणेश लकारे, शुभम शिंदे, अजगर खाटीक आदी उपस्थित होते.