जयंत पाटीलांचे निलंबन विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न – राष्ट्रवादी कॉंग्रेस

जयंत पाटीलांचे निलंबन विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न – राष्ट्रवादी कॉंग्रेस

Jayant Patil’s suspension is an attempt to suppress the voice of opposition – Nationalist Congress

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onFir23 Dec22 , 16.10 Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव:- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांना नागपूर अधिवेशन संपेपर्यंत निलंबिन विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न, असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया  कोपरगाव येथे राष्ट्रवादी  काँग्रेसच्या निषेध आंदोलनात शुक्रवारी (दि.२३) रोजी उमटल्या, नायब तहसीलदार मनीषा कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी बोलतांना राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे म्हणाले की, राज्याच्या राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी हिवाळी अधिवेशनात राज्याच्या जनतेच्या अतिशय महत्वाच्या विषयाला वाचा फोडून सरकारला धारेवर धरले. सीमा प्रश्न, राष्ट्रपुरुषाचा अपमान करणाऱ्या प्रवृत्ती, अतिवृष्टी नुकसान भरपाई आदी विषयांना हात घातला. त्यावेळी सरकारला घेरले जाण्याच्या भीतीपोटी अभ्यासू व्यक्तींना बाजूला ठेवण्याच्या उद्देशातून  विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांना हिवाळी अधिवेशनात मुंबई व नागपूर विधानभवन परिसरात प्रवेशावर घालण्यात आलेली बंदी सूडबुद्धीचे राजकारण आहे. हे लोकशाहीसाठी हानीकारक असून या प्रवृत्तीचा निषेध करीत असून त्यांचे निलंबन तातडीने मागे घ्यावे अशी त्यांनी केली .

 यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कारभारी आगवन, शहराध्यक्ष सुनील गंगूले, युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी,  श्रावण आसणे, शिवाजी घुले, सुनील मांजरे, मनोज जगझाप, दिनार कुदळे, विष्णु शिंदे,  पौर्णिमा जगधने,  मधुकर टेके,  विरेन बोरावके, मंदार पहाडे, कृष्णा आढाव, दिनकर खरे, फकीर कुरेशी, अजीज शेख, राजेंद्र वाकचौरे,  सुनील शिलेदार, चंद्रशेखर म्हस्के, जावेद शेख, प्रकाश दुशिंग, सांडूभाई पठाण, देवेन रोहमारे, रामदास केकाण, संदीप कपिले, धनंजय कहार, वाल्मीक लहिरे, अशोक आव्हाटे, इम्तियाजअत्तार, राजेंद्र आभाळे, आकाश डागा, विजय नागरे, शुभम लासुरे, किशोर डोखे, सागर लकारे, मुकुंद इंगळे, संतोष दळवी, नितीन शेलार, चांदभाई पठाण, ऋषिकेश खैरनार, प्रशांत वाबळे, अक्षय आंग्रे, एकनाथ गंगूले, राजेंद्र खैरनार, शैलेश साबळे, समीर वर्पे,  संदीप आरगडे, बाळासाहेब पवार, रावसाहेब चौधरी, चांगदेव बारहाते, भाऊसाहेब भाबड, विक्रम बाचकर, शिवाजी बाचकर, विलास चव्हाण, सुधाकर वादे, अजित सिनगर, राहुल जगधने, भास्करराव आदमाने, दिनेश साळुंके, पांडुरंग कुदळे, अशोक मलिक, नानासाहेब चौधरी, अजय पवार, अमन घनगाव, निकेश घनघाव, राजेश घनगाव, किरण घनघाव, मिथुन गायकवाड, बाळासाहेब सिनगर, दत्तात्रय सिनगर, विलास पाटोळे, राहुल चवंडके, शंकर घोडेराव, अय्युब कच्छी, रोशन खैरनार, किरण बागुल, आकाश गायकवाड,  राहुल राठोड, परवेज शेख, सुरेश सोनटक्के,  नितीन शिंदे, बाळासाहेब दहे, प्रदीप कुऱ्हाडे, गोरख कानडे, दिनेश संत, हर्षल जैस्वाल, सिद्धेश होले, रिंकेश खडांगळे, जयहरी वाघ, गणेश लकारे, गणेश बोरुडे, समर्थ दीक्षित, संजय कट्टे, राणी बोर्डे, सविता भोसले, भाग्यश्री बोरुडे आदी मान्यवरांसह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page