शेतकरी दिन: सौ स्नेहलता कोल्हे यांनी साधला शेतक-यांशी संवाद,
Farmers’ Day: Mrs. Snehalata Kolhe interacted with the farmers,
बाजार समिती ; व्यापारी, हमाल आणि शेतकरी समेट Market Committee; Traders, porters and farmers reconciled
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onFir23 Dec22 , 16.00 Pm
By राजेंद्र सालकर
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : कोपरगांव बाजार समिती येथील शेतक-यांची हक्काची संस्था असून सध्या खरीप हंगामातील पीके काढुन ती मोठया प्रमाणांत बाजार समितीत शेतकरीवर्ग विक्रीसाठी घेवुन येतात मात्र काही कुरबुरीमुळे शुक्रवारी शेतमाल विक्री व्यवस्था बंद करण्याच्या मार्गावर होती, भाजपाच्या प्रदेश सचिव सौ स्नेहलता कोल्हे यांनी शेतकरीदिनी येथील शेतकरी, व्यापारी आणि हमाल बांधवांशी चर्चा करून समेट घडवून आणला आणि शेतमाल विक्री व्यवस्था पुन्हा सुरू करण्यात आली त्यामुळे शेतक-यांनी सौ. कोल्हे यांना धन्यवाद दिले आहे.
गेल्या दोन वर्षापासुन कोरोना आपत्ती संकटाशी आपण सर्वचजण दोन हात करतो आहोत, पर्जन्यमान ब-यापैकी आहे, खरीप हंगाम ऐन पीक काढणीत असतांना शेतक-यांना अतिवृष्टीमुळे दणका दिला त्यामुळे जी पिके शेतक-यांच्या हाती लागली होती ती त्यांनी कोपरगांव बाजार समितीत विक्री व्यवस्थेसाठी आणली पण स्थानिक पातळीवर भावावरून शुक्रवारी संघर्ष सुरू झाला होता. ही विकी व्यवस्था पुन्हा आठ दहा दिवस बंद पडली तर शेतक-यांच्या तोंडचे पाणी पळेल, त्यांना रब्बी पीक लागवडीसाठी आर्थीक नियोजन करता येणार नाही अशा एक ना अनेक अडचणी असतांना भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलता कोल्हे यांनी शुकवारी थेट भेट सर्याच्या समस्या ऐकुन घेत त्यावर समाधानकारक तोडगा काढुन बाजार समितीत शेतमाल विकी व्यवस्था पुन्हा सुरू करण्यात आली. याप्रसंगी विविध संस्थांचे आजी माजी संचालक, पदाधिकारी, शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.
Post Views:
164