कोपरगावची वेस शिवकालीन पद्धतीने बांधा; राष्ट्रवादी काँग्रेस
Build the Ves of Kopargaon in Shiva style; Nationalist Congress
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onWed28 Dec22 , 17.20 Pm By राजेंद्र सालकर
कोपरगाव : पडझड झालेली कोपरगाव शहरातील ऐतिहासिक पौराणिक वारसा लाभलेली वेस शिवकालीन पद्धतीने बांधा अशी मागणी कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नगरपालिकेकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे सदर निवेदन उपमुख्याधिकारी ज्ञानेश्वर चाकणे यांनी स्वीकारले
शहरातील प्रभाग क्र. ५ मध्ये पुराणतन वेसची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे. कोपरगाव शहराच्या वैभवात भर घालण्यासाठी या वेसचे शिवकालीन पद्धतीचे बांधकाम करण्यात यावे अशी प्रभाग ५ मधील नागरिकांची मागणी आहे. त्या मागणीचा विचार करून तातडीने या ‘वेस’ चे काम सुरु करावे असे म्हटले आहे.
यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, मंदार पहाडे, राजेंद्र वाकचौरे, रमेश गवळी, कृष्णा आढाव, फकीर कुरेशी, दिनकर खरे, राहुल देवळालीकर, बाळासाहेब रुईकर, धनंजय कहार, वाल्मिक लहिरे, आकाश डागा, ऋषिकेश खैरनार, एकनाथ गंगूले, महेश उदावंत, संतोष शेलार, चांदभाई पठाण, विलास आव्हाड, अय्युब कच्छी, नितीन शिंदे, गणेश लकारे, सुरेंद्र सोनटक्के, संदीप सावतडकर, संदीप देवळालीकर, शिवा लकारे, अमोल आढाव, मुकुंद भुतडा, समर्थ दीक्षित, अमोल देवकर, अनिरुद्ध काळे आदी उपस्थित होते.