सोने खरेदीच्या  बहाण्याने चोरी करणाऱ्या चोरटीला कोपरगाव पोलिसांनी ठोकल्या बेड्या

सोने खरेदीच्या  बहाण्याने चोरी करणाऱ्या चोरटीला कोपरगाव पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Kopargaon Police handcuffed a thief who was stealing on the pretext of buying gold

साडेचार लाखाचा मुद्देमाल जप्त Four and a half lakh worth of goods seized

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onTue27 Dec22 , 20.20 Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव  : शहरात सराफ दुकानांमध्ये सोने खरेदीच्या बहान्याने येवुन सोन्याचे दागीने चोरणारे चोरटीला कोपरगाव शहर पोलीसांनी पुणे जिल्हयातुन  ४,६२,८६० /- रुपयाच्या मुद्देमालासह  जेरबंद केले. 

आरोपीच्या ताब्यातून५५,०००/- रू. किंची २२ कॅरेट सोन्याचा १९ ग्रॅम ६०० मिली वजनाचा नविन नेकलेस  ३,००,००० /- रू. किंची लॅन्सर बिट सीव्ही चारचाकी गाडी तिचा रजि. नं.एम.एच. १२ए.एफ.८२०९, १३,००० /- रू. किंचा विवो कंपनीचा आकाशी रंगाचा बंद मोबाईल १३,००० /- रू. किंचा ओप्पो कंपनीचा निळया रंगाचा बंद मोबाईल १३,००० /- रू. किंचा विवो कंपनीचा निळया रंगाचा बंद मोबाईल ५०,०००/- रू. किचे १०ग्रॅम वजनाचे मिनी गंटण आत्मा मलीक ज्वेलर्स कोपरगाव या दुकानातुन आरोपीने चोरलेले जप्त १८,८६०/- रू किचे ४ ग्रॅम १०० मिली वजनाचे सोन्याचे कानातील बहुरानी जोड चेतन अलंकार या दुकानातुन आरोपीने चोरलेले. जप्त ४,६२,८६० /- रु एकुण मुद्देमाल ताब्यातुन जप्त केली.
जया सचीन बडगुजर रा-भारतनगर, कात्रज, पुणे असे या महिलेचे नाव असून ती सराईत गुन्हेगार आहे. हिने आतापर्यंत किती चोऱ्या केल्या आहेत, याचा तपास पोलिस करीत आहेत.सराफांचे दुकानात सोने खरेदीच्या बहान्याने दोन महीला व पुरूष येवुन सराफ
व्यावसायिकांची दागीने खरेदी करण्याचे बहान्याने हात चलाखीने सोन्याचे दागीने चोरीचे सत्र सुरु होते. मागील वर्षापासुन सराफांचे सोने चोरीबाबत गुन्हे उघडकीस येत नव्हते.
सदर यशस्वी कामगीरी मा. पोलीस अधिक्षक  राकेश ओला सो. अहमदनगर, अप्पर पोलीस अधिक्षक श्रीरामपुर  स्वाती भोर मॅडम, उपविभागिय पोलीस अधिकारी  संजय सातव सो. यांचे मार्गदर्शनाखाली पोनि वासुदेव देसले.सो, पोसई- भरत दाते, पोकॉ- सुंबे, काकडे मपोकॉ-दिवे, बनकर, धराडे चालक पोना-गोडसे,रहाणे अप्पर पोलीस अधिक्षक कार्यालय, श्रीरामपुर सायबर सेलचे पोकॉ-फुरकान शेख यांनी यशस्वीरीत्या कामगीरी केली आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page