संजीवनी पाॅलीटेक्निकच्या तीन विध्यार्थ्यांना श्नायडर  मध्ये नोकरी- अमित कोल्हे                                                       

संजीवनी पाॅलीटेक्निकच्या तीन विध्यार्थ्यांना श्नायडर  मध्ये नोकरी- अमित कोल्हे

Three students of Sanjeevani Polytechnic get jobs at Schneider – Amit Kolhe

१९ व्या वर्षी  रू ३. ७५ लाखांचे वार्षिक पॅकेज 3 at the age of 19. 75 lakhs annual package

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Wed15 Feb23 , 16.40 Pm By राजेंद्र सालकर

कोपरगांव: संजीवनी के.बी.पी. पाॅलीटेक्निकच्या ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नाने  श्नायडर  इलेक्ट्रिक इंडिया प्रा. लि. कंपनीने  संजीवनीच्या तीन विद्यार्थ्यांची  १९ व्या वर्षीच  ३. ७५ लाख वार्षिक पॅकेजवर नोकरीसाठी निवड केली त्यामुळे ते आता कुटुंबाचा आधार बनतील असे मत  संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  मॅनेजिंग ट्रस्टी  अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे व्यक्त केले आहे .
अमित कोल्हे म्हणाले  की पाॅलीटेक्निकच्या तीन वर्षांच्या  अभ्यासक्रमात विध्यार्थी जेव्हा शेवटच्या सत्रात असतात, तेव्हा ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नाने विविध नामांकित कंपन्यांना कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हसाठी आंमत्रित केल्या जाते. यात कंपनींचे एचआर मॅनेजर्स विध्यार्थ्यांच्या  मुलाखती घेतात. सुरूवातीलाच ऑटोमेशन, इलेक्ट्रिक उपकरणे/यंत्रे, इत्यादी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या  बहुराष्ट्रीय  युरोपियन कंपनी  श्नायडरचा ड्राईव्ह झाला. यात या कंपनीने अपुर्वा अनिल भोंगळे, राजा कुमार व अभिषेक  कुमार यांची रू ३. ७५ लाखांच्या वार्षिक  पॅकेजवर नोकरीसाठी निवड केली आहे. हे विध्यार्थी त्यांच्या अंतिम सत्राच्या परीक्षेच्या निकालानंतर लागलीच नोकरीत  रूजु होणार आहे. ही खरे तर विद्यार्थी  पालक व कुटुंबासाठी  फार मोठी गोष्ट आहे
संजीवनी पाॅलीटेक्निकमध्ये  विध्यार्थी अंतिम वर्षात  आल्यावर त्यांना नोकरी करायची की उच्च शिक्षणासाठी जायचे, हे पर्याय विचारून त्यांच्या पालकांची संमती घेवुन नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्या विध्यार्थ्यांना  कंपनीनिहाय व शाखेनिहाय विशेष प्रशिक्षण  दिल्या जाते, त्यामुळे विध्यार्थी कंपन्याच्या कसोट्यांना  अगदी सहज सामोरे जावुन आपले नोकरदार होण्याचे स्वप्न पुर्ण करतात.
निवड झालेल्या विध्यार्थ्यांचे  अमित कोल्हे यांनी छोटेखानी कार्यक्रमात सत्कार केला. यावेळी प्राचार्य प्रा. ए. आर. मिरीकर, ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट ऑफिसर  प्रा. आय. के. सय्यद, विभाग प्रमुख प्रा. जी. एन. वट्टमवार व प्रा. आर. व्ही. भाकरे उपस्थित होते. संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  अध्यक्ष  नितिनदादा कोल्हे व विश्वस्त  सुमित कोल्हे यांनी निवड झालेले विध्यार्थी व त्यांच्या भाग्यवान पालकांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

You cannot copy content of this page