कोपरगाव ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; ट्रॅक्टर चोरी करणाऱ्या टोळीतील दोघांसह  १२ लाखाचा २० हजाराचा मुद्देमाल हस्तगत

कोपरगाव ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; ट्रॅक्टर चोरी करणाऱ्या टोळीतील दोघांसह  १२ लाखाचा २० हजाराचा मुद्देमाल हस्तगत

Brilliant performance of Kopargaon Rural Police; Along with two members of the gang who stole the tractor, goods worth 12 lakhs and 20 thousand were seized

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Wed15 Feb23 , 16.30 Pm By राजेंद्र सालकर

कोपरगाव  : ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; ट्रॅक्टर चोरी करणाऱ्या टोळीतील दोघांसह १२  लाख २० हजाराचा मुद्देमाल हस्तगत, ४ ट्रॅक्टर्स चोरणाऱ्या सहा जणांच्या टोळीतील दोन जण पोलिसांच्या ताब्यात, तीन जण फरार तर टोळीत  एका  अल्पवयीन मुलाचा समावेश, उपविभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी यांचे पथक व कोपरगाव ग्रामीण पोलिसांच्या चमकदार कामगिरीमुळे पोलिस कर्मचाऱ्यांचं  नगर जिल्ह्यात   सर्वत्र त्याचं कौतुक होत आहे.

कोपरगाव  तालुक्यात मागच्या काही दिवसांपासून चोरीच्या घटना अधिक वाढल्या होत्या. २४ जानेवारी रोजी करंजी येथून उत्तम रायमान चरमळ यांचे मालकीचा महिंद्रा कंपनीचा लाल रंगाचा ट्रॅक्टर तर २५ जानेवारी २३
कोळपेवाडी शिवारातून महेंद्र दिपक कोळपे यांचे मालकीचा महिंद्रा कंपनीचा जिओ लाल रंगाचा ट्रॅक्टर असे दोन दिवसात दोन ट्रॅक्टर राहत्या घरासमोरून चोरीला गेले होते.वारंवार तक्रारी येत असल्यामुळे पोलिसही चिंतेत होते. काही लोकांचा संशय आल्यानंतर पोलिसांनी  चौकशी सुरु केली. 
त्यानंतर  सदर गुन्हयाचा तपास सुरु असतांना संजय सातव, उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी  यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मंगेश सुदाम वर्पे, रा. कनोली, ता. संगमनेर, जि. अहमदनगर व त्यांचे साथीदारांनी गुन्हा केला असून नमूदचे ट्रॅक्टर  हे फायनान्स कंपनीचे असून कमी किमतीत मिळतील असे सांगून शेतकऱ्यांची फसवणूक करून इसम
नामे मंगेश सुदाम वर्पे, रा. कनोली, ता. संगमनेर, जि. अहमदनगर व अतुल सखाराम घुले, रा. संगमनेर, ता. संगमनेर, जि. अहमदनगर हे विक्री करणार असलेबाबत माहिती मिळाली. अशा बातमीच्या आधारे कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशन व उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी  एसडीपीओ  यांनी सुचना दिल्या. नमुद पथकाने वरिष्ठांचे सुचनेप्रमाणे तपासकामी जाऊन नमुदचे इसमांबाबत माहिती प्राप्त करुन त्यांना ताब्यात घेतले. सदरचे इसमांकडे गुन्हयाबाबत विचारपूस केली असून त्यांनी त्यांचे इतर साथीदारासह ट्रॅक्टर  चोरी केलेबाबत तसेच ते शेतकन्यांना फायनान्स कंपनीचे असल्याचे सांगुन विक्री करणार असलेची कबुली दिली आहे. त्यांना कोपरगांव पोलीस ठाणे कडील गुन्हयात अटक करुन त्यांची दोन दिवसाची पोलीस कस्टडी घेऊन त्यांची सखोल चौकशी केली तेव्हा त्यांचेकडुन  कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशन २,५०,०००/- रु. किमतीचा एक महिंद्रा कंपनीचा ५७५ सरपंच लाल रंगाचा ट्रॅक्टर , पिपळगांव बसवंत नाशिक ग्रामिण ४ लाख रुपये किमतीचा एक स्वराज कंपनीचा ७२४ औरचिड ट्रैक्टर लाल रंगाचा,कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशन १ लाख ७० हजार रुपये किमतीचा एक महिंद्रा कंपनीचा  दाल रंगाचा जियो २४५  आप ट्रॅक्टर, संगमनेर तालुका पोलीस  स्टेशनचा चार लाख रुपये किमतीचा हिरव्या रंगाचा जॉन डिअर कंपनीचा हिरवे रंगाचा ट्रॅक्टर , असे एकूण  बारा लाख वीस हजार रुपये किमतीचे चार ट्रॅक्टर  चोरट्यासह ताब्यात घेतले आहेत 
अशा प्रकारची कौतुकास्पद कामगिरी पोलीस अधिक्षक, राकेश ओला,. अपर पोलीस अधिक्षक  स्वाती भोर मैडम,  उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव  यांचे मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड , उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे तपास पथकातील पोहेकॉ इरफान शेख, पो. ना. अशोक शिंदे, पो. ना. कृष्णा कुन्हे, सायबर पोलीस स्टेशन येथील पोना/फुरखान शेख, प्रमोद जाधव, तसेच कोपरगांव तालुका पो.स्टे. तपासी अंमलदार पोहेकॉ निजाम शेख, पोना कोकाटे यांनी केली आहे. उर्वरीत तिघे सापडल्यानंतर त्यांची सुध्दा चौकशी करण्यात येणार आहे.

कोट 

गेल्या काही दिवसापासून शेतकरी व शेतीशी संबंधित विद्युत मोटारी ट्रॅक्टर व अवजारांच्या चोरीचे प्रमाण वाढले होते त्यामुळे आम्ही याकडे लक्ष केंद्रित केले असल्यामुळे आम्हाला तातडीने या प्रकरणाचा छडा  लावण्यात यश आले  आहे अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव  यांनी दिली.

Leave a Reply

You cannot copy content of this page