नवीन पिढीने  थोरांच्या आदर्शावर जीवन प्रवास करावा – बिपिनदादा कोल्हे

नवीन पिढीने  थोरांच्या आदर्शावर जीवन प्रवास करावा – बिपिनदादा कोल्हे

The new generation should follow the ideals of the greats – Bipindada Kolhe

  संजीवनी अकॅडमीचे वार्षिक  स्नेहसम्मेलन Sanjeevani Academy’s annual convocation

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Wed 8 March23 ,19.00 Pm By राजेंद्र सालकर


कोपरगांव: उद्योजक श्री नारायण मुर्ती, श्री रतन टाटा व स्व. शंकरराव  कोल्हे यांची उभारलेली तैलचित्रे सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. अशा  थोर व्यक्तींचे आदर्श  सुध्दा नविन पिढीने डोळ्यासमोर  ठेवुन आपला जीवन प्रवास करावा, असे प्रतिपादन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष  बिपिनदादा कोल्हे यांनी संजीवनी अकॅडमीच्या उद्योजकता या संकल्पनेवरील दोन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलनात  केले.

बिपिन दादा कोल्हे पुढे म्हणाले , बालवयातच चांगल्या गुणांची रूजवण होते. मासाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवाजी  महाराजांना बालवयात स्वराज्याचे धडे दिले म्हणुन हिंदवी स्वराज्य स्थापन झाले. संत ज्ञानेश्वरांनी  वयाच्या १६ व्या वर्षी  ज्ञानेश्वरी  लिहुन संपुर्ण जगाला ज्ञानामृत पाजले. संत मुक्ताबाईंनी बालवयात केलेल्या अभंगाच्या रचना आजही भावतात. म्हणुन बालवयातील संस्काराला अनन्य साधारण महत्व आहे. शंकरराव कोल्हे यांनी बहात्तर वर्षांपूर्वी परदेशात व्यवसाय करण्यापेक्षा ग्रामीण भागात केजी ते पीएचडी पर्यंत शिक्षणाची सोय केली हजारो विद्यार्थी प्रगत देशांमध्ये कार्यरत आहेत तर अनेक जणांनी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत पहिल्यादा क्रमांकात येऊन गोल्ड मेडल मिळवले आहे हीच खरी संजीवनी ची उपलब्धी असल्याचे गौरव उद्गार त्यांनी यावेळी व्यक्त केले
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  अध्यक्ष  नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी  अमित कोल्हे, उद्योजक  कौशिक  मुजुमदार, उद्योजीका सौ. मनीषा  धात्रक व  संचालिका डाॅ. मनाली कोल्हे यांनी उपस्थिती देवुन विद्यार्थ्यांचे कौतुक केले.  
सांस्कृतिक कार्यक्रमांच्या मेजवानीबरोबरच उद्योजक ही संकल्पना विद्यार्थ्यांमध्ये  बिंबविण्यासाठी उद्योजकता आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यात विद्यार्थ्यांनी  त्यांच्या व्यवहार चातुर्याचे दर्शन  घडविले.

उद्योजक कौशिक  मुजुमदार व उद्योजिका सौ मनिशा धात्रक यांनी स्नेहसम्मेलनाच्या दुसऱ्या  दिवशी विध्यार्थ्यानी  उद्योजकता संकल्पनेतुन उभारलेल्या स्टाॅल्सला भेटी देवुन विध्यार्थ्यांच्या  मार्केटींग स्कीलचे कौतुक केले.
संचालिका डाॅ. कोल्हे म्हणाल्या की अभ्यासाबरोबरच विध्यार्थ्यांना  व्यवहार ज्ञान देणे आवश्यक  आहे. आजच्या उद्योजकता आनंदोत्सव मेळाव्यातुन भविष्यात  दहा टक्के जरी विध्यार्थी उद्योजक झाले तर आमचा हेतु सफल झाला, असे आम्ही मानु. यावेळी त्यांनी पालकांना आवाहन केले की आपले पाल्य भविष्यात  एखादा उद्योग काढून इतरांना रोजगार देत असतील तर त्यांच्या पाठीशी  उभे रहा.
     प्राचार्या शैला झुंजारराव यांनी स्कूलच्या प्रगतीचा आलेख मांडला. या आनंदोत्सवात इ. १ ली ते ८ वी च्या विद्यार्थ्यांनी  खाद्यपदार्थ, गेम्स, भाजीपाला, आर्टस् अँड  क्राफ्टस्, इत्यादींचे स्टाॅल्स उभारले होते. पालक व नातेवाईकांलनी स्टाॅल्सवर जावुन मनमुराद आनंद लुटला. संजीवनी एमबीएचे विध्यार्थी व प्राद्यापकांनी विध्यार्थ्यांना  दोन दिवस अगोदर मार्केटींगचे धडे दिले.
    भव्य रंगमंच, उत्कृष्ट  ध्वनी व्यवस्था, आकर्षक विद्युत  रोषणाई , भव्य बैठक व्यवस्था आणि बाल कलांकारांनी  सादर केलेल्या कलेला मिळणारा प्रचंड प्रतिसाद तसेच संजीवनी अकॅडमीच्या शिक्षकांकडून प्रत्येक पालकाचे व येणाऱ्या  मान्यवरांचे स्वागत हे या आनंदोत्सवाची वैशिष्ट्ये  होती.

Leave a Reply

You cannot copy content of this page