महिला दिनी स्नेहलता कोल्हे यांचे सेल्फी विथ ‘लाभार्थी’ अभियान; स्त्री शक्ती, मातृशक्तीचा गौरव
Snehalata Kolhe’s selfie with ‘Bharthi’ campaign on Women’s Day; The glory of female power, maternal power
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Wed 8 March23 ,19.10 Pm By राजेंद्र सालकर
कोपरगाव : स्त्रीशक्ती, मातृशक्ती ही स्त्रीला सन्मान देणाऱ्या भारतीय संस्कृतीची ओळख आहे. राजमाता जिजाऊ माँसाहेब, पुण्यश्लोक अहिल्याबाई क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रेरणेतून अनेक माता भगिनींनी विविध क्षेत्रात आपली कर्तबगार सिद्ध केल्याने देशाच्या विकासात महिलांचे मोठे योगदान आहे. महिला दिनाचे औचित्य साधत भाजपा प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी बुधवारी कोपरगावातून देशव्यापी सेल्फी विथ ‘लाभार्थी’; अभियानाची सुरुवात केली.
सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांसोबत सेल्फी घेण्याचे अभियान महिला दिनी बुधवारी
(८ मार्च) कोपरगाव मतदार संघातून सुरू झाले.
सौ स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, ‘महिलांचा खऱ्याअर्थाने सन्मान करणारे नरेंद्र मोदी हेच एकमेव पंतप्रधान आहेत आणि म्हणूनच कोणत्याही महिलेने मागणी केलेली नसताना ११ कोटी स्वच्छतागृह बांधून महिला-मुलींची लज्जेपासून मुक्तता केली. ११ कोटी नागरिकांना नळाद्वारे पाणी देणे असो की ८० कोटी नागरिकांना अन्नसुरक्षा योजना लागू करणे असो, पंतप्रधान उज्ज्वला योजना, जनधन योजना, श्रावण बाळ योजना, गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना, संजय गांधी निराधार योजना अशा विविध योजनां सुरू करून पंतप्रधान मोदींनीच महिलांचा गौरव केला आहे.
सर्वसामान्य महिलांसाठीही केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अनेक योजना सुरू केल्या आहेत. या जनहितकारी योजनांमुळे सर्वसामान्य महिलांसह उपेक्षित व वंचित घटकांच्या जीवनात आमूलाग्र बदल झाला आहे. केंद्रातील व राज्यातील भाजपचे सरकार हे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवून विकासाला गती देणारे सरकार असल्याचे त्यांनी यावेळेस म्हटले आहे. विविध योजनांचा लाभ घेतलेल्या महिलांसमवेत मोबाईलद्वारे सेल्फी फोटो काढला. यावेळी सौ. स्नेहलता कोल्हे यांनी महिलांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न जाणून घेतले.
Post Views:
179