समाजसेवेचा अमृतकुंभ- बिपीनदादा कोल्हे.
Amrit Kumbh of Social Service – Bipindada Kolhe.
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue20 June24,21.00Pm
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : जनसामान्यांचे प्रश्न समजुन घेवून त्यावर मार्ग काढणे यात संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांचा हातखंडा आहे. कोपरगांव तालुका हा अवर्षणग्रस्त त्यामुळे येथे सतत पर्जन्यमान कमी त्यावर उपाययोजना करण्यांसाठी बिपीनदादा कोल्हे यांनी सातत्याने मेहनत घेत पर्यावरण संतुलन राखण्यांत मोठे काम केले आहे. वृक्षारोपणाची चळवळ हाती घेवुन मागेल त्याला वृक्ष पुरवून त्याच्या जोपासनेसाठी नेहमीच मदत केलेली आहे.
बिपीनदादा कोल्हे हे बी. एस्सी (ॲग्री) कृषी पदवीधर असल्याने शेतक-यांच्या समस्या काय आहेत व त्यावर कुठल्या उपाययोजना केल्या पाहिजे याबाबत त्यांचा चिकीत्सक अभ्यास असून त्यावर तात्काळ मार्ग देखील काढतात. येसगांव सारख्या ग्रामिण भागातील शेतकरी कुटूंबांत त्यांचा २१ जुन रोजी जन्म झाला. शिक्षणानंतर त्यांनी सामाजिक राजकीय जीवनांत प्रवेश करून नागरिकांच्या समस्या काय आहेत याचा जवळून अभ्यास केला.
कोपरगांव तालुका पंचायत समितीच्या सभापतीपदापासून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. माजी मंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांच्याकडून त्यांनी राजकीय धडे घेतले. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना, डेक्कन शुगर टेक्नॉलाजीस्ट असोसिएशन पुणे, अहमदनगर जिल्हा परिषद, अहमदनगर जिल्हा सहकारी बँक, रयत शिक्षण संस्था, इफको, कृभको नविदिल्ली, भारतीय कृषि अनुसंधान नविदिल्ली, भारत सरकार कृषि मंत्रालय नविदिल्ली अंतर्गत फळबाग विकास समिती, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघ, सहकाररत्न शंकररावजी कोल्हे शेतकरी सहकारी संघ, महाराष्ट्र राज्य शुटींग बॉल असोसिएशन आदि संस्थांवर तसेच विविध राजकीय संघटनांचे राज्यपातळीवर काम करून आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त शिडींच्या श्री साईबाबा संस्थानचे विश्वस्त म्हणूनही त्यांच्या कार्याचा नांवलौकीक आहे. गरीब, दीन दलित, गरजु, मध्यमवर्गीय रुग्णांना वैद्यकिय सेवा उपलब्ध करून हजारोवेळा अनेकांचे प्राण वाचविण्यासाठी स्वतः रक्तदानातुन त्यांनी मोठे सहाय्य केलेले आहे.
किल्लारी, लातुर त्याचप्रमाणे गुजराथ भूकंपग्रस्तांना तसेच पुरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तु गोळा करून त्याची मदत थेट नुकसानग्रस्त भागात पोहोचवून सामाजिक कार्याचे औदार्य दाखविलेले आहे. ७ ते ९ ऑगस्ट २००६ रोजी कोपरगांव शहरासह गोदावरी नदी काठालगत असलेल्या २४ गावांमध्ये मोठया प्रमाणांत महापुर आला होता. महापुरामुळे अनेक ठिकाणी दाणादाण उडाली होती. या पुरग्रस्तांना दोन वेळचे जेवण, चहा कॉफी दुध पाणी, नाष्टा, गरजवंतांना धान्य, पुरामुळे निर्माण झालेली रोगराई त्यासाठी स्वच्छतेची मोहिम हाती घेवुन पुरग्रस्तांच्या दारी त्याचप्रमाणे कोराना महामारीत थेट मोफत वैद्यकिय सेवा, रुग्णवाहिका पुरवून हजारो निराधारांना मायेचा आधार दिलेला आहे. कोरोना महामारीत दोलायमान झालेली बाजारपेठ पूर्वपदावर आणण्यासाठी त्याचप्रमाणे सुशिक्षीत बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी विशेष पुढाकार घेतला.
ग्रामिण भागात सुशिक्षीत बेरोजगारांचे प्रमाण वाढते आहे त्यासाठी त्यांनी राज्यात सर्वप्रथम बीपीओ कॉल सेंटर उघडुन कित्येकांना रोजगाराच्या संधी निर्माण करून दिल्या. शेतक-यांचे उस उत्पादनाबरोबच अन्य पिकांचे उत्पादन वाढले पाहिजे यासाठी नेमकेपणांने मार्गदशनासह मोफत उच्च प्रतीचे दर्जेदार उस बेणे पुरवून शेतक-यांना बांधावरच प्रत्येक समस्येची निराकरण करण्याचा प्रयत्न केला. तंत्रज्ञान बांधापर्यंत पोहोचविले. वेळप्रसंगी उपग्रहाद्वारे शेतक-यांना विविध किडी रोगासंबंधी माहिती दिली. किटकनाशक फवारणीसाठी द्रोण तंत्रज्ञान उपलब्ध केले. खरीप व रब्बी हंगामात शेतकऱ्यांना आवश्यक असणारे दर्जेदार बी बियाणे व खतांचा पुरेसा साठा उपलब्ध करण्यात ते पुढाकार घेत असतात.
बिपीनदादा कोल्हे मनांने हळवे आहेत पण त्यांच्या सामाजिक कामाचा आवाका प्रचंड आहे. २१ व्या शतकात सहकारात काय काय बदल केले म्हणजे त्यातुन शेतक-यासह सर्वांना फायदा होईल हा दुरदृष्टीकोन ते सतत बाळगतात. सध्या केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी सहकाराला विशेष पाठबळ दिले आहे. संगणकाचा प्रभावी वापर सहकारात होत आहे. भविष्यात निर्माण होणा-या संकटावर कशा प्रकारे मात करायची याचेही त्यांना उत्तम ज्ञान आहे. म्हणुनच कृषक भारती को. ऑपरेटीव्ह लि. नविदिल्ली या संस्थेने बिपिनदादा कोल्हे यांना सहकार विभूषण हा किताब बहाल केला. २८ वर्षाच्या साखर कारखानदारीतील प्रदिर्घ कारकिर्दीबद्दल सोसायटी फॉर शुगरकेन रिसर्च अँड डेव्हलपमेंट (एसएसआरडी) कोईमतूर या संस्थेने त्यांच्या कामगिरीचा देशपातळीवर गौरव करून सन्मान केला आहे. त्यातुन त्यांच्या कार्याची व्याप्ती मोठी असल्याची जाणीव होते.
वाचन, फुटबॉल, व्हॉलीबॉल, हॉकी, बॅडमिंटन यात त्यांना विशेष आवड आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोले येथे कृषि पदवीकेचे शिक्षण घेत असतांना खेळामध्ये विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून त्यांनी नांवलौकीक उमटवला.
स्वतःचा वाढदिवस दुसऱ्यांना उपयुक्त ठरला पाहिजे या दृष्टिकोनातून ते हार तुरे सत्कार मोठा बडे जाव टाळून त्या खर्चातील रकमेत स्वतःची रक्कम घालून ग्रामीण भागातील मुला-मुलींना मोफत लिखाणासाठी दरवर्षी लाखो वह्यांचे वाटप करून विविध गोशाळेंना मोफत हिरवा चारा पुरवून वाढदिवस साजरा करण्याच्या पद्धतीत अमुलाग्र बदल घडवून दाखवला आहे. शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळ असताना त्यांनी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे सर्व केमिकल उत्पादने बंद ठेवून नागरिकांना व जनावरांना पिण्यासाठी मोफत पिण्याच्या पाणी पुरवले आहे. तुटीच्या उर्ध्व गोदावरी खोऱ्यातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने संघर्ष करून वेळप्रसंगी रस्त्यावर येत आंदोलने केली आहेत., शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी उपलब्ध करण्यासाठी त्यांचा आटोकात प्रयत्न असतो. विनोबा भावे आणि बाबा आमटे यांच्याकडून त्यांना सामाजिक कार्याची ऊर्जा मिळाली आहे. आपत्तीग्रस्त काळात शेतकऱ्यांना पिक विमा मिळवून देण्यासाठी त्यांनी संपूर्ण मतदारसंघात विशेष अभियान राबवले त्यामुळेच येथील शेतकऱ्यांना कोट्यावधी रुपयांचा पिक विमा त्यांनी मिळवून दिला आहे. अपघातग्रस्तांसह आजारपणात मदत करण्यासाठी ते अहोरात्र उपलब्ध असतात. ग्रामिण भागातील प्रश्न काय आहेत आणि त्याच्या सोडवणुकीसाठी नेमकेपणाने काय केले पाहिजे यावरच त्यांचे नेहमी काम चालु असते. जनसामान्यांच्या सामाजिक कामाचा अमृतकुंभ ते यशस्वीपणे हाताळतात परमेश्वर त्यांना दिर्घायुष्य व उत्तम आयुरारोग्य देवो हिच मनोकामना…