संजीवनीच्या विद्यार्थ्यांचा जागतिक स्तरावर नावलौकिक व्हावा हाच प्रयत्न – बिपिन  कोल्हे.

संजीवनीच्या विद्यार्थ्यांचा जागतिक स्तरावर नावलौकिक व्हावा हाच प्रयत्न – बिपिन  कोल्हे.

Sanjivani’s students are trying to become world famous – Bipin Kolhe. –

१० वी व इ. १२ वी  गुणवंतांचा सत्कार 10th and etc. 12th felicitation of meritorious persons

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Wed21June24,16.00Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव :  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा जागतिक स्तरावर नावलौकिक व्हावा या   माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी पाहिलेल्या स्वप्नपूर्तीसाठीच संजीवनी शैक्षणिक संस्थेचा प्रयत्न असल्याचे गौरवोद्गार संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे यांनी बुधवारी (२१जुन) रोजी  दहावी बारावी गुणवंत विद्यार्थी व पालक यांच्या सोलर पार्क येथील सत्कार सोहळ्यात केले. विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या पाय-या पादाक्रांत करून कुटूंबासह तालुक्याचा अभिमान वाढवावा. असेही ते म्हणाले,   

यावेळी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे संजीवनी इन्स्टिट्यूट चे  विश्वस्त सुमित कोल्हे कोल्हे कारखान्याचे उपाध्यक्ष रमेश घोडेराव माजी सभापती  मच्छिंद्र टेके शरद थोरात यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला
  
            प्रारंभी प्राचार्य ए. आर. मिरीकर, डॉ. विपुल पटेल, यांनी उपस्थितांचे स्वागत केले. संचालक डॉ. ए. जी. ठाकुर यांनी विविध शैक्षणिक बाबींची माहिती दिली. प्रगतशील देशांच्या  तुलनेत संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टीट्युटचा विद्यार्थी कुठेही कमी पडु नये म्हणून त्याच्या पायाभूत ज्ञानकक्षा रूंदावण्यावर भर देवून त्या योग्यतेचे वातावरण आणि शैक्षणिक संच, मार्गदर्शन येथे उपलब्ध करून देण्यांत आले आहे. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक कल पाहुन त्याप्रमाणे त्यांना आवश्यक असणारे सर्व मार्गदर्शन येथे देण्यांचा अध्यक्ष नितीन कोल्हे, बिपीन कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे हे सातत्याने प्रयत्न करत असतात तेव्हा पालकांनी आपल्या पाल्याच्या आवडीनुसार शिक्षण द्यावे.
           बिपीन कोल्हे पुढे म्हणाले की, दहावी बारावीत मिळालेल्या यशाने विद्यार्थ्यांनी हुरळून जाऊ नये. अभियांत्रीकी, तांत्रीक, पदवी, पदवीका व पी.एच. डी पर्यंतच्या पाय-या ज्ञानाच्या सहाय्याने पार कराव्यात. पालकांनी मुलांची शिक्षण इच्छा जोपासून त्याप्रमाणे त्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न करावा. संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे रोपटे माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी १९८२ मध्ये लावले आज त्याचा विशाल वटवृक्ष झाला आहे.   येथून शिक्षण घेवून बाहेर पडणारे मुले मुली जगाच्या कानाकोप-यात थेट अमेरिकन अंतराळ संस्था नासा, भारतीय अंतराळ संस्था इस्रो  आदि जागतिक स्तरावरील नामांकित उच्च पदावर काम करताना दिसतात याचा आम्हाला अभिमान आहे. इंग्रजी ही जगाची परिभाषा झाली आहे. ती आत्मसात करावी. हल्लीच्या विद्यार्थ्यांना मराठी, हिंदी बरोबरच जगात ज्या भाषा अग्रमानांकित आहे त्या यायलाच पाहिजे म्हणजे आपण त्या स्पर्धेत पोहचू शकु. ग्रामिण भागातील मुला मुलींनी, त्याप्रमाणे शेतक-यांच्या पाल्यांनी तांत्रीक शिक्षणात क्रांती करून जगाच्या पाठीवर नाव कमवावे हे माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांचे स्वप्न होते आणि ते प्रत्यक्षात उतरविण्यासाठी संजीवनी ग्रुप ऑफ इंस्टीटयुटचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. याच संस्थेत शिकून विशाल जाधव या विद्यार्थ्याने १९. ६० लाख रूपयाचे वार्षीक पॅकेज मिळविले, अफसीन शेख विद्यार्थीनीने वैद्यकिय प्रवेश पात्रता परीक्षेत भारतात गुणवत्ता प्राप्त पाच हजार मुलांमध्ये स्थान पटकावले हे ऑटोनॉमस संजीवनी शिक्षण संस्थेचे यश असल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. साहेबराव दवंगे यांनी करून उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply

You cannot copy content of this page