पाथरेगावात दोन दुचाकीच्या अपघात; आर्मी मेजरचा आणि सोनेवाडीच्या तरूणाचा मृत्यू

पाथरेगावात दोन दुचाकीच्या अपघात; आर्मी मेजरचा आणि सोनेवाडीच्या तरूणाचा मृत्यू

Two bike accidents in Pathregaon; Death of Army Major and Sonewadi youth

कोपरगाव : शिर्डी नाशिक मार्गावरील पाथरी शिवारात रविवारी (१६)  रोजी दुपारी ३ वाजता वळणावर दोन  दुचाकीच्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात  सैन्य दलातील जवानाचा  मृत्यू झाला असून, सोनेवाडी येथील तरूणाचा देखील  मृत्यू झाला आहे. मयत हे दोघे एकमेकांचे मावसभाऊ होते

शिर्डी नाशिक महामार्गावरील पाथरे  गाव परिसरात हा अपघात झाला, सिन्नर येथून पल्सर मोटरसायकल (एम एच 15 एच ए 9006 ) अक्षय पाटीलला जावळे (२५ )रा सोनेवाडी ता. कोपरगाव जि. अहमदनगर व आर्मी मेजर सचिन राजाराम गुजर (२४) रा. धानोरे ता.निफाड जि नाशिक हे कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी ला येत असताना अक्षय गायकवाड यांच्या प्लेटिना  (एम एच 15 डीबी 9670) ही दुचाकी  विरुद्ध बाजूला वळत असताना जोराची धडक झाली.अपघाताचा आवाज ऐकून पाथरेचे सरपंच मच्छिंद्र चिने, मनोज गवळी यांनी मोबाईल व आधार कार्डचा संदर्भ घेत नातेवाईकांना या संदर्भात कल्पना दिली.अपघातात जखमी झालेल्या या तिघांनाही तातडीने शिर्डी येथे सुपरहॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. अक्षय जावळे यांचा दवाखान्यात पोहोचण्यापूर्वीच रविवारीच मृत्यू झाला. असल्याचे डॉक्टरने सांगितले. तर मेजर सचिन गुजर यांच्यावर उपचार चालू होता मात्र उपचाराला कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांचाही सोमवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या दुःखद निधनाने सोनेवाडी व धानोरे परिसरात मोठी शोककळा पसरली आहे.
 शिर्डी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत पंचनामा करत राहता ग्रामीण रुग्णालयातुन  शवविच्छेदन केल्यानंतर अक्षय जावळे यांचे पार्थिवावर सोमवारी दुपारी साडेबारा वाजता शोकाकुल वातावरणात सोनेवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
तर शिर्डी येथे उपचारादरम्यान सोमवारी अकरा वाजता सचिन गुजर यांचा मृत्यू झाला आहे.त्यांचे पार्थिव शवविच्छेदन करण्यासाठी नाशिक येथे पाठविण्यात आला असून त्यांच्यावर आज मंगळवारी  शासकीय इतमात धानोरे येथे अंत्यसंस्कार होणार आहे. अक्षय गायकवाड रा. खेडलेझुंगे ता निफाड जि नाशिक हा तरुण गंभीर जखमी झाला आहे  त्याची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर शिर्डी सुपर स्पेशलिटी मध्ये उपचार सुरु आहेत. 

Leave a Reply

You cannot copy content of this page