कोपरगाव जनआक्रोश मोर्चा शहर व तालुका बंदचे आवाहन, मोर्चाची तयारी पूर्ण

कोपरगाव जनआक्रोश मोर्चा शहर व तालुका बंदचे आवाहन, मोर्चाची तयारी पूर्ण

Kopargaon Jan Akrosh Morcha City and Taluka bandh call, preparations for the march complete

आयोजित जनआक्रोश मोर्चा च्या सुचना व रुपरेषाInstructions and outline of organized Jan Akrosh Morcha

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onWed19July24,19.00Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव :    सकल हिंदू समाज जन आक्रोश मोर्चा आज गुरूवारी २०जुलै रोजी  शहर व तालुका बंदचे आवाहन, सकल हिंदू समाज  बैठकीत करण्यात आले ; मोर्चाची तयारी पूर्ण झाली असून बुधवारी दुपारी एक वाजता व्यापारी धर्मशाळा येथे आयोजित  जनआक्रोश मोर्चा च्या सुचना व रुपरेषा याबाबतची माहिती विजय वहाडणे यांनी पत्रकार परिषदेत दिली

 
मोर्चा आज गुरुवारी सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण  त्यानंतर धर्मध्वजाचे संतमंहंतांच्या हस्ते पुजन,मोर्चात सर्वात पुढे धर्मध्वज व साधुसंत असतील.त्या नंतर महिला मुली त्या नंतर पुरुष मोर्चा चा मार्ग – छत्रपती शिवाजी महाराज स्मारक पासून सुरू सावरकर चौक,कन्याविद्या मंदिर, गांधीनगर,श्रीराम मंदिर,छत्रपती संभाजी महाराज चौक, धारणगांव रोड, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक, छत्रपती शिवाजी महाराज स्मारका जवळ सभेत रूपांतर होईल. 
येथे सभा व्यासपीठावर  प्रमुख वक्ते धर्मयोध्दा  सुरेश चव्हाणके , हर्षाताई ठाकुर, श्रद्धाताई शिंदे व सागर बेग(अध्यक्ष – श्रीराम संघ) हे तीन वक्ते व पूजनीय साधुसंत विराजमान होतील  व्यासपीठाच्या डाव्या बाजूला महिला व युवती तर उजव्या बाजूला पुरुष बसतील,मोर्चा दरम्यान कोणीही आक्षेपार्ह घोषणा देऊ नये कारण हा निषेध मोर्चा चे नेतृत्व प्राणप्रिय भगवा ध्वज अर्थात धर्मध्वज करणार असल्याने याचा अपमान होणार नाही याची काळजी घ्यावी,मोर्चा च्या दिवशी पाऊस असल्यास प्रत्येकाने रेनकोट अथवा छत्री घेऊन येणे,बाहेर गावाहून येणाऱ्या वाहनांची संख्या प्रचंड असल्याने पार्किंग ची व्यवस्था के बी पी विद्यालय ग्राउंड मार्केट यार्ड बैल बाजार मूकबधिर के जे सोमय्या कॉलेज चंद्रप्रभात नगर या ठिकाणी करण्यात आली आहे  याच ठिकाणी बाहेर जाऊन आलेल्यांसाठी नाश्ता पाकिटाची व्यवस्था करण्यात आली आहे याबाबत समजवुन घेऊन स्वयंसेवकांना सहकार्य करणे
पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ठिकठिकाणी व मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे, त्यामुळे एकाच ठिकाणी गर्दी करू नये. आदीसूचना कृती समितीच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आल्या या पत्रकार परिषदेसाठी  विजय  वहाडणे, राजेंद्र झावरे,  संतोष गंगवाल,  कैलास जाधव, प्रमोद लबडे, कलविंदर दडियाल, सुनील गंगुले, दत्ता काले, सनी वाघ, विनायक गायकवाड,  बाळासाहेब जाधव, अशोक लकारे, अनिल गायकवाड, सुनील फंड, स्वप्निल निखाडे, विनोद राक्षे, योगेश बागुल, बबलू वाणी, सचिन गवारे, मंदार  पहाडे, चेतन खुबानी, जितेंद्र रणशुर, राजेंद्र सोनवणे, सुभाष दवंगे, प्रफुल्ल शिंगाडे, सुनील शिलेदार,  बाळासाहेब रुईकर, सोमनाथ गायकवाड,  यासह शहरातील विविध  जाती धर्म पंथ  राजकीय पक्ष व संघटना  पदाधिकारी उपस्थित होते   शहरासह तालुक्यातील २८ते ३० पेक्षा जास्त ग्रामपंचायती, दयासागर ग्रुप  व शिवराय तरुण मंडळ  या संघटनेच्या  सभासदांनी पदाधिकाऱ्यांनी  मोर्चाला आपला पाठिंबा दर्शविला आहे 
 

कोपरगाव शहर व तालुका  बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्यामुळे आक्रोश मोर्चात होणारा जनसमुदाय पाहता  पोलीस प्रशासनाने  जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली  चोख पोलीस बंदोबस्त  ठेवण्यात आला आहे .  यामध्ये ३५० पोलीस कर्मचारी, ५० अधिकारी, आरसीपी, क्यूआरटी, रॅपिड ऍक्शन फोर्स  आदींचा समावेश असेल. मोर्चा मार्गावर ठिकठिकाणी  सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत बुधवारी सायंकाळी मोर्चा मार्गावरून  पोलिसांनी  रूट मार्च केला

Leave a Reply

You cannot copy content of this page