कोपरगाव रेल्वेस्थानकाचा कायापालट होणार – स्नेहलता कोल्हे
Kopargaon railway station will be transformed – Snehlata Kolhe
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sun6Aug24,18.20Pm
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकासामुळे प्रवाशांना अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध होणार आहेत. रेल्वेस्थानकाचा कायापालट होऊन कोपरगाव मतदारसंघाच्या विकासाला चालना मिळणार असल्याचे मत माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी व्यक्त केले,
रेल्वे मंत्रालयाच्या वतीने अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत २५ हजार कोटी रुपये खर्चून कोपरगावसह देशभरातील ५०८ रेल्वेस्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार असून त्यात कोपरगाव स्थानकाचा समावेश केला गेला याबद्दल सौ.स्नेहलता कोल्हे यांनी
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे व दर्शना जरदोश यांचे मतदारसंघातील सर्व जनतेच्या वतीने आभार मानले.
या विविध विकासकामांची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी (६ ऑगस्ट) सकाळी ११ वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून करण्यात आली. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण कोपरगाव रेल्वेस्थानक येथे करण्यात आले. त्यावेळी स्नेहलता कोल्हे बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर खा. सदाशिव लोखंडे, आ. आशुतोष काळे, मध्य रेल्वेचे सोलापूर विभागाचे वरिष्ठ अभियंता मोहम्मद फैज, भाजपचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे, तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, शहराध्यक्ष दत्ता , माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे, रवींद्र पाठक, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष कमलाकर कोते, बाबासाहेब पवार, महिला आघाडीप्रमुख विमल पुंडे, कोपरगाव रेल्वेस्थानकाचे व्यवस्थापक बी. एस. प्रसाद आदी उपस्थित होते.
स्नेहलता कोल्हे पुढे म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने मागील नऊ वर्षांत जनतेच्या हिताला प्राधान्य देत अनेक विकासकामे केलेली आहेत. विकसित भारताचे उद्दिष्ट ठेवून मोदी सरकार काम करत आहे. आता अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या २९.९४ कोटी रुपये निधीतून कोपरगाव रेल्वेस्थानकाचा विकास व सुशोभिकरण होणार आहे. यामध्ये रेल्वे स्टेशन परिसरातील रस्ता, पार्किंग, पादचारी मार्ग, संरक्षण भिंत, प्रवेशदवार, स्वच्छतागृह, निवासस्थाने, स्टेशन इमारतीचे नूतनीकरण, ओव्हर ब्रिज रॅम्प अशा अनेक कामांचा समावेश आहे. यामुळे निश्चितच रेल्वे प्रवाशांची सोय होणार आहे. अशा विविध विकासकामांमुळे कोपरगाव रेल्वेस्थानकाचा कायापालट होणार असून, या परिसराच्या वैभवात भर पडणार आहे.
यावेळी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रमेश घोडेराव, संचालक बाळासाहेब वक्ते, बापूसाहेब बाराहाते, ज्ञानेश्वर परजणे,रमेश गवळी, शिंगणापूरचे सरपंच डॉ.विजय काळे, माजी सरपंच भीमा संवत्सरकर,, राजेंद्र लोणारी, लक्ष्मीकांत संवत्सरकर, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, संजय सातभाई, माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे, पीपल्स बँकेचे अध्यक्ष कैलासशेठ ठोळे, संजीवनी पतसंस्थेचे अध्यक्ष प्रदीप नवले, आदींसह संजीवनी उद्योग समूहाचे पदाधिकारी, स्थानिक रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य, रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी, शिंगणापूर ग्रामपंचायतचे पदाधिकारी, भाजपचे पदाधिकारी,माजी नगरसेवक, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी खासदार सदाशिव लोखंडे यांचे भाषण झाले. स्वागत व प्रास्ताविक सोलापूर विभागाचे वरिष्ठ अभियंता मोहम्मद फैज यांनी केले. यावेळी शिंगणापूर जि प प्राथमिक शाळा व संजीवनी इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर गीते व समूह नृत्य सादर केले.
चौकट.
स्नेहलता कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली शिंगणापूर ग्रामस्थांच्या वतीने मध्य रेल्वेचे सोलापूर विभागाचे वरिष्ठ अभियंता मोहम्मद फैज यांना निवेदन देण्यात आले.याबद्दल कोल्हे यांचे शिंगणापूर ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले.
Post Views:
98