आढावा बैठक:शासनआपल्या दारी’ हा ऐतिहासिक व लोकाभिमुख उपक्रम – स्नेहलता कोल्हे

आढावा बैठक:शासनआपल्या दारी’ हा ऐतिहासिक व लोकाभिमुख उपक्रम – स्नेहलता कोल्हे

Meeting: A historic and people-oriented initiative ‘Government at your Doorstep’ – Snehlata Kolhe

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Thu10Aug24,10.00Am
By राजेंद्र सालकर

कोपरगाव : शासनाच्या विविध कल्याणकारी योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘शासन आपल्या दारी’ हे महत्त्वाकांक्षी अभियान राबविण्यात येत आहे.या ऐतिहासिक व लोकाभिमुख उपक्रमाच्या माध्यमातून कोपरगाव विधानसभा मतदारसंघात हजारो लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यात येत आहे, असे माजी आमदार  स्नेहलता कोल्हे यांनी सांगितले. जास्तीत जास्त नागरिकांनी या अभियानात सहभागी होऊन शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

कोपरगाव तालुक्यातील काकडी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाच्या तयारीनिमित्त बुधवारी (९ ऑगस्ट) कोपरगाव येथील पंचायत समितीत  आढावा बैठक  त्या बोलत होत्या.
काकडी येथील कार्यक्रमाची तशीच कोपरगाव तालुक्यातून जाणाऱ्या लाभार्थ्यांच्या नियोजनाबाबत प्रशासनाने केलेल्या तयारीची स्नेहलता कोल्हे यांनी सविस्तर माहिती घेऊन बस वाहतुकीबाबत अधिकाऱ्यांना सूचना केल्या.  लाभार्थी वेळेत पोहोचतील यादृष्टीने नियुक्त करण्यात आलेल्या नोडल व समन्वयक अधिकाऱ्यांनी गावनिहाय नियोजन करावे. कार्यक्रमास येणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या अधिक असल्याने आरोग्याच्या दृष्टीने आरोग्य पथक, रुग्णवाहिका आदी व्यवस्था करण्यात यावी, असेही त्यांनी सुचवले. 
स्नेहलता कोल्हे म्हणाल्या,  पाण्याची समस्या बिकट बनली आहे. त्यामुळे गोदावरी कालव्यांना आवर्तन सोडण्याची गरज आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरलेले ‘महाबीज’ कंपनीचे सोयाबीनचे बियाणे उगवले नाही. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. कृषी अधिकाऱ्यांनी संबंधित शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळवून द्यावी व बोगस बियाणे विकणाऱ्या कंपन्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.   
राज्य सरकारने सर्वसामान्य जनतेच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाच्या माध्यमातून  दीड कोटीहून अधिक लाभार्थ्यांना लाभ झाला आहे. असे त्यांनी सांगितले.
या बैठकीस आ. आशुतोष काळे, तहसीलदार संदीप भोसले, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे,  शिवाजीराव वक्ते, भाजपचे शहराध्यक्ष दत्ता काले,  कोल्हे  कारखान्याचे उपाध्यक्ष रमेश घोडेराव,  त्र्यंबकराव सरोदे, बाळासाहेब वक्ते, ज्ञानेश्वर परजणे, बापूसाहेब बारहाते, ज्ञानदेव औताडे, सतीश आव्हाड, राजेंद्र कोळपे, रमेश गवळी, सतीश केकाण, विजय वाजे, स्वप्नील निखाडे, रिपाइंचे दीपक गायकवाड, ‘ गोपीनाथ गायकवाड,  विक्रम पाचोरे, जयेश बडवे, मुकुंदमामा काळे,   सतीश रानोडे,  खालिक कुरेशी, राजेंद्र बागुल, रवींद्र रोहमारे, दीपक चौधरी, सरपंच रवींद्र आगवन (करंजी), जयराम वारकर (खोपडी), कैलास रहाणे, शिवाजी जाधव, संदीप देवकर, जगदीश मोरे, चंद्रकांत वाघमारे, पिंकी चोपडा, किरण सुपेकर, संतोष नेरे, सिद्धार्थ साठे, रोहित कनगरे, राजेंद्र औताडे, दत्तात्रय गुंजाळ, देविदास रोठे, दत्तात्रय शिंदे, विजय डांगे, अनिल शिंदे, महेश माळी, मुख्तार पठाण आदींसह शासकीय अधिकारी, संजीवनी उद्योग समूहाशी संलग्न संस्था, भाजप व इतर पक्षांचे पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर परिषदेचे माजी सदस्य, शेतकरी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page