क्रांतिदिनानिमित्त कोल्हे कारखान्यात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी  घेतली पंचप्राण शपथ

क्रांतिदिनानिमित्त कोल्हे कारखान्यात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी  घेतली पंचप्राण शपथ

On the occasion of Revolution Day, officials and employees took Panchaprana Oath in Kolhe Factory

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Thu10Aug24,18.00Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव : क्रांतिदिनानिमित्त कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर येथील सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्यात अधिकारी कर्मचारी यांचा  पंचप्राण शपथ हा कार्यक्रम घेण्यात आला. 

 संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली 9 ऑगस्ट रोजी सकाळी क्रांतीदिनी कार्यकारी संचालक बाजीराव सुतार  यांच्या हस्ते शहीद वीर जवानांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. त्यानंतर सर्वांनी पंचप्राण शपथ घेतली. या वेळी बाजीराव सुतार यांनी अमृत महोत्सवी स्वातंत्र्याच्या यशोगाथेबाबत माहिती दिली. 
देशातील शहीद वीर जवानांना नमन करण्यासाठी व त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी भारत देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “माझी माती माझा देश’ हा संदेश तळागाळात पोहोचविण्यासाठी या अभियानाची सुरुवात  क्रांती दिनापासून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार व सर्व मंत्री महोदयांनी केली, त्याचबरोबर साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी राज्यातील सर्व साखर कारखान्यांना याबाबत परिपत्रक काढून आवाहन केले होते.
यावेळी साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, व्यवस्थापकीय व्यवस्थापक प्रकाश डुंबरे, मानव संसाधन विकास विभागाचे अधिकारी प्रदीप गुरव, मुख्यलेखापाल एस.एन. पवार, ऊस व्यवस्थापक गोरखनाथ शिंदे, मुख्य रसायन तज्ञ विवेककुमार शुक्ला यांच्यासह विविध विभागाचे खाते प्रमुख, उपखाते प्रमुख, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी कामगार कल्याण अधिकारी एस. सी. चिने यांनी आभार मानले.

Leave a Reply

You cannot copy content of this page