उत्कृष्ट निकाल : संजीवनी डी. फार्मसीला एमएसबीटीई कडून ‘उत्कृष्ट ’ दर्जा
Best Result : Sanjeevani D. Pharmacy ‘Excellent’ grade from MSBTE
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Thu10Aug24,18.20Pm
By राजेंद्र सालकर
कोपरगांव: महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ (एमएसबीटीई), मुंबईने एप्रिल, २०२३ मध्ये शैक्षणिक वर्ष २०२२- २३ साठीचे अकॅडमिक मॉनिटरींग (शैक्षणिक निरीक्षण) केले होते. या निरीक्षणाचा निकाल मंडळाने नुकताच जाहिर केला आहे. संजीवनी कॉलेज ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च ही संस्था पदवी, पदव्युत्तर पदवी व पीएचडीचे शिक्षण देते. तसेच याच संस्थेच्या अंतर्गत डी. फार्मसीचा विभागही चालविल्या जातो. या डी. फार्मसी विभागाला मंडळाने गुणवत्ता व दर्जाच्या आधारावर उत्कृष्ट (एक्सलंट) दर्जा दिला आहे. तसेच या विभागाने उत्कृष्ट निकालाचीही परंपरा कायम राखली आहे, अशी माहिती संस्थेच्या वतीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
पत्रकात निकाला बाबत म्हटले आहे की एमएसबीटीईने एप्रिल/मे २०२३ मध्ये घेतलेल्या परीक्षांच्या निकालात संजीवनच्या डी. फार्मसीच्या दुसऱ्या वर्षाचा निकाल ९५ टक्के तर प्रथमवर्षाचा निकाल ९१ टक्के लागला आहे. राज्यातील बहुतांशी डी. फार्मसी संस्थांचा निकाल कमी लागल्यामुळे राज्यातील डी. फार्मसी संस्थाचालकांच्या विनंती नुसार महाराष्ट्र सरकारने फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाकडे प्रथम वर्षात नापास झालेल्या विध्यार्थ्यांसाठी दुसऱ्या वर्षात प्रवेश देण्याची (कॅरी ऑन) परवानगी मिळविली. परंतु अशा विध्यार्थ्यांना पुढिल परीक्षेमध्ये सध्या नापास झालेल्या विषयांची परीक्षा द्यावी लागणार आहे. यावरून संजीवनी डी. फार्मसीचा निकाल उत्कृष्ट लागला आहे, हे अधोरेखित होत आहे.
अकॅडमिक मॉनिटरींग कमिटीने संस्थेस भेट दिली तेव्हा मंडळाच्या मानकांप्रमाणे निरिक्षण केले. यात प्रामुख्याने परीक्षांचे निकाल, विध्यार्थी व शिक्षकांनी सादर केलेले शोध निबंध व त्यांचे यश , विध्यार्थ्यांचा प्रकल्प प्रदर्शनात सहभाग व यश , विध्यार्थ्यांचा विविध क्रीडा स्पर्धांमधिल सहभाग व यश , शिक्षक व विध्यार्थ्यांचा विविध कार्यशाळा , सेमिनार्स, इत्यादी मधिल सहभाग, संस्थेने आयोजीत केलेले विविध उपक्रम, विध्यार्थ्यांची हजेरी, प्राद्यापकांनी वाढवलेली शैक्षणिक अर्हता, माजी विध्यार्थ्यांचे नेटवर्क, इत्यादी बाबींची पुराव्यानिशी संस्थेच्या वतीने सादरकरण करण्यात आले. डी. फार्मसी विभाग सर्व बाजुंनी मजबुत असल्याने या विभागाने आता नॅशनल बोर्ड ऑफ अक्रिडिटेशन, नवी दिल्ली या संस्थेकडे एनबीए मानांकन प्राप्त करण्यासाठी व येणाऱ्या मुल्यांकन समितीला सामोरे जाण्यासाठीही प्रस्ताव सादर केला आहे.
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे चे अध्यक्ष नितिन कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे व विश्वस्त सुमित कोल्हे यांनी डी. फार्मसी विभागाच्या विविध उपलब्धींबाबत प्राचार्य डॉ. विपुल पटेल, विभाग प्रमुख प्रा. एन. एस पेंडभाजे, सर्व कर्मचारी व विध्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
Post Views:
107