ठाकरे सेनेचा अल्टीमेटम: मागच्या अतिवृष्टीचे पैसे शेतकऱ्यांना द्या; अन्यथा रस्त्यावर उतरू- प्रमोद लबडे
Thackeray Sena’s ultimatum: Pay farmers for last heavy rains; Otherwise we will hit the road – Pramod Labade
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Fir 1Sep24,19.00Pm
By राजेंद्र सालकर
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : तालुक्यात शेतकऱ्यांचा वाली कोणी आहे का.? गतसाली झालेल्या अतिवृष्टी नंतर पंचनाम्यांचा फार्स झाला पण, अजूनही अनेक शेतकऱ्यांना कोणतीही नुकसान भरपाई नाहीच!येत्या सहा तारखेपर्यंत त्यांना पैसे द्या; अन्यथा सात तारखेला रस्त्यावर उतरू असा इशारा ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख प्रमोद लबडे यांनी एका निवेदनाद्वारे शासनाला दिला आहे.
शुक्रवारी (दि१) रोजी प्रमोद लबडे यांनी तहसीलदार यांच्या दालनात जाऊन प्रांताधिकारी माणिकराव आहेर व तहसीलदार संदीपकुमार भोसले यांना निवेदन दिले.यावेळी नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते या देखील होत्या.
निवेदन देतांना जिल्हाप्रमुख प्रमोद लबडे, तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे, उपजिल्हाप्रमुख असलम शेख, शहर प्रमुख सनी वाघ, माजी शहर प्रमुख भरत मोरे, तालुका कार्याध्यक्ष गिरधर पवार, उपतालुका राजेंद्र नाजगड, तालुका समन्वयक मुन्नाभाई मन्सूरी आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.
तालुक्यात गतसाली जून ऑगस्ट मध्ये झालेल्या अतिवृष्टीनंतर पंचनामाचा फार्स झाला सुरेगाव पोहेगाव मंडळातील काही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली परंतु कोपरगाव रवंदा दहेगाव बोलका या तीन मंडळातील शेतकऱ्यांना अद्यापही नुकसान भरपाई मिळालेली नाहीच ! हा भेदभाव कशासाठी असा सवाल करून येत्या सहा तारखेपर्यंत त्यांना पैसे द्या; शेतकऱ्यांसमोर असलेल्या अडचणी विषयी प्रमोद लबडे यांनी प्रांताधिकारी माणिकराव आहेर व तहसीलदार संदीप कुमार भोसले यांच्याशी प्रत्यक्ष सविस्तर चर्चा केली व परिस्थितीचे गांभीर्य त्यांच्या लक्षात आणून दिले यावर त्यांनी याबाबत सकारात्मक कारवाई करण्याची ग्वाही दिली असल्याचे लबडे यांनी आमचे प्रतिनिधीशी बोलताना सांगितले सांगितले
प्रमोद लबडे यांनी निवेदनात म्हटले आहे की मतदार संघातील शेतकऱ्यांचा वाली कोणी आहे का.?मध्यंतरी शेतकऱ्यांनी या संदर्भात आंदोलन केले होते, मात्र जिल्हाधिकारी यांनी आश्वासन देऊनही मदत होत नसल्याने संबंधित शेतकरी हवालदिल झाले आहे. निसर्ग कोपल्याने खरिपाची पिके १००% हातातून गेली आहे. गोदावरी कालव्यांना पाणी सोडूनही वेळेत शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी नाही. शासन मात्र समन्यायी पाणी वाटपाचे कायद्याचे काटेकोरपणे अंमलबजावणी करताना दिसतेच, मात्र इकडे विविध पद्धतीने शेतकरी वर्ग पूर्णतः मेटाकुटीस आलेला दिसत आहे. २७ मार्चला दुसरा आदेश काढून जिरायती ८ हजार, बागायती १७ हजार तर बहुवार्षिक पिकांसाठी २२ हजार ५०० रुपये अनुदान निश्चित केले होते. शासनाने मदतीची घोषणा करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसले. शेतकऱ्यांना संकटात लोटणाऱ्या शिंदे सरकारच्या नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत शेतकरी असून अध्यापही शिंदे सरकारने तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली नसल्याने शेतकरी वर्गात कमालीचे संताप व्यक्त होत आहे. राज्य शासनातील शिंदे सरकारने त्वरित आमच्या खात्यावर पैसे जमा करावे व आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी कोपरगाव तालुक्यातील शेतकरी वर्गा मधून होत आहे.अतिवृष्टीचे पैसे ६ सप्टेंबर पर्यंत मिळाले नाही तर ७ सप्टेंबर पासून वंचित शेतकऱ्यांसह ठाकरे शिवसेना तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार असल्याचा पुनरुच्चार जिल्हाप्रमुख लबडे यांनी निवेदनातून केला आहे
Post Views:
313