विद्यार्थी दशा हा  जीवनातील सुवर्णकाळ; शिस्त ही यशस्वी व जबाबदार नागरिक घडवते – प्रदीप देशमुख 

विद्यार्थी दशा हा  जीवनातील सुवर्णकाळ; शिस्त ही यशस्वी व जबाबदार नागरिक घडवते – प्रदीप देशमुख 

Student Dasha is the golden period of life; Discipline makes a successful and responsible citizen – Pradeep Deshmukh

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onSat 2Sep24,14.20Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव:- विद्यार्थी दशा ही मानवी जीवनातील सुवर्णकाळ असल्याने प्रत्येकाने या काळात शिस्त अंगीकारणे  महत्त्वाचे आहे कारण शिस्त ही यशस्वी व जबाबदार नागरिक घडवित असल्याचे प्रतिपादन कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी येथील के. जे.सोमय्या महाविद्यालयात शुक्रवारी ‘विद्यार्थी सु-संवाद” या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना केले. अध्यक्षस्थानी संस्थेचे विश्वस्त संदीप रोहमारे हे होते. 

पोनि. देशमुख पुढे म्हणाले की, भारताची गौरवशाली परंपरा आहे.सामाजिक, धार्मिक व जातीय सलोखा राखावा, महाविद्यालयीन जीवनात आपल्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगिण विकास करून व अंगी शिस्त बाळगून विद्यार्थ्यांवर होत असलेल्या बेशिस्त वर्तनाचा शिक्का पुसून टाकावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
 प्रास्ताविकात प्राचार्य डॉ.बी.एस.यादव यांनी महाविद्यालयात शिकत असलेल्या विद्यार्थ्याच्या पालकत्वाची महाविद्यालयाने घेतलेली जबाबदारी नमूद करतांनाच महाविद्यालयाच्या शैक्षणिक जडणघडणीत कोपरगाव पोलीस स्टेशनच्या वतीने सतत मिळत असलेल्या सहकार्याचे कौतुक केले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संजय दवंगे यांनी तर आभार  कनिष्ठ महाविद्यालयाचे उप-प्राचार्य प्रा. बी.आर.सोनवणे यांनी केले. या ‘विद्यार्थी सु-संवाद’ कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे रजिस्ट्रार डॉ. अभिजित नाईकवाडे,  प्रा. गोरखनाथ डोंगरे यांच्यासह कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page