स्व. शंकरराव कोल्हे यांचा वारसा दुसरी व तिसरी पिढी पुढे चालवीत आहे – चांदगुडे महाराज.
self The legacy of Shankarao Kolhe is being carried forward by the second and third generation – Chandgude Maharaj.
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onSun 10Sep24, 18.20Pm
By राजेंद्र सालकर
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : फिरत्या वैद्यकीय सेवेतून खेड्यापाड्यातील गोरगरिबांची मोफत वैद्यकीय तपासणी करून गरिबांच्या उन्नतीसाठी आयुष्य वेचणाऱ्या माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हेंचा वारसा त्यांची दुसरी व तिसरी पिढी पुढे चालवीत असल्याचे प्रतिपादन वारकरी संप्रदायाचे हभप बाबुराव महाराज चांदगुडे यांनी चासनळी येथे केले. अध्यक्षस्थानी कोल्हे कारखान्याचे उपाध्यक्ष मनेष गाडे होते.
ह भ प बाबुराव महाराज पुढे म्हणाले की, बिपिन कोल्हे व नितीन कोल्हे या दुसऱ्या पिढीने आयुर्वेदिक महाविद्यालय सुरू करून वैद्यकीय शिक्षण अभ्यासक्रमाला चालना दिली आहे. त्यांच्या तिसऱ्या पिढीने गोरगरीब जनतेचे दारापर्यंत वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी कीर्ती वैद्यकीय सेवा सुरू केली आहे माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी महिला बचत गटाची क्रांती घडवून आणली आहे. तर कोल्हे कारखाना अध्यक्ष अध्यक्ष विवेक कोल्हे ग्रामीण भागातील वंचित घटकांचे दुःख दूर करण्यासाठी कष्ट घेत आहेत.
माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचा वाढदिवस कोल्हे कुटुंबीय मोफत वैद्यकीय तपासणी, मोफत नेत्र मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया, हुशार गोरगरीब, मुला मुलींना मोफत वह्या, शालेय साहित्यांचे वाटप करून वंचित घटकांचा आनंद द्विगुणीत करीत आहेत त्यांचा हा उपक्रम सर्वांनाच प्रेरणा देणारा आहे.
याशिबीरात २०० रुग्णांची तपासणी करून त्यांना मोफत औषधे देण्यात आली. कोल्हे कारखान्याचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष चासनळीचे सुपुत्र मनेष गाडे यांचा सत्कार करण्यात आला.
Post Views:
91