कोपरगाव तालुका पोलिसांची कारवाई कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या १८ गायींची सुटका
Kopargaon taluka police action rescue of 18 cows being taken for slaughter
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onSun 10Sep24, 18.40Pm
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : एक टेम्पोमधून कत्तलीसाठी चालविलेली १८ जनावरे नागरिकांच्या सतर्कतेमुळे बचावली असून, दोन लाख ७१ हजार ६०० रुपये किमतीचे पिकअप वाहन व १८ जनावरे कारवाईत जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध गोवंश हत्याबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला असून, त्यांना अटक करण्यात आली आहे.
रविवारी (दि.१०) रोजी कत्तलीसाठी निर्दयीपणे तोंडाला चिगट टेप बांधून पिकअप वाहन मध्ये दाटी वाटीने बांधून सदर जनावरांची चारा पाण्याची कोणतीही सोय न करता निर्दयपणे वागणूक देऊन तोंडे बांधून ठेवून, कत्तल करून गोमांस विक्री करण्याच्या उद्देशाने अमानुषपने चालवलेले 18 नर जातीचे जर्सी व गावरान गौवंश मढी गावात वाचवण्यात कोपरगांव तालुका पोलीस स्टेशनला यश आले ,पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी ही कारवाई केली . दोन लाख ७१ हजार ६००रुपये किमतीचे पिकप वाहन व १८ जनावर कारवाईत जप्त करण्यात आले आहे.
याबाबत मयूर माणिक विधाटे राहणार दत्तनगर कोपरगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अब्दुल फारूक शेख व (२५) राहणार ममदापूर तालुका राहाता याचे विरुद्ध ४४०/२३ महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा अधिनियम १९९५ चे सुधारित कलम ५ व ९ तसेच प्राण्यांना निर्दयीतेने वागवण्यास प्रतिबंध कायदा कलम तीन व अकरा प्रमाणे गुन्हा नोंदवला आहे.
दुसऱ्या एका कारवाईत पोलीस कॉन्स्टेबल अविनाश तमनर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लतीफ शरीफ कुरेशी वय (५५) राहणार संजय नगर कोपरगाव याचे विरुद्ध मोजे कोळपेवाडी गावचे शिवारात पाठीमागे रोडच्या पूर्वेस महबूब शरीफ कुरेशी याचे मालकीच्या घरात साडेसात हजार रुपये किमतीचे २५ किलो वजनाचे गोमास मिळून आल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त गोमा स नमुने प्रयोगशाळेत पाठवले असून उपसंचालक न्याय सहाय्यक प्रयोगशाळा नाशिक यांनी सदरचे नमुने हे गुन्हा दाखल असल्याशिवाय प्रयोगशाळेत परीक्षणाकरता स्वीकारले जात नाही असे कळवल्याने ,सदर घटनेच्या अनुषंगाने आज फिर्याद देण्यात आली असल्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्यात गोवंश जातीची कत्तल करण्यास मनाई असताना देखील त्यांन गोवंश जातीचे जनावरे कत्तल करून विक्री करण्याच्या उद्देशाने तसेच जीविकास धोकादायक असलेल्या रोगांचा संसर्ग पसरविण्याचा संभव असल्याचे माहिती असताना देखील गोमोस विक्रीसाठी जवळ बाळगताना तो मिळून आल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
कारवाईत सहभागी असलेल्या सर्व पोलिस अधिकाऱ्यांचे, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांचे आभार मांनण्यात आले आहेत.सदर गोवंश पुढील संगोपनसाठी तालुक्यातील कोकमठान येथील गोकुलधाम गौरक्षा केंद्र येथे सुखरूप पाठविण्यात आले आहेत.
Post Views:
173