विवेक कोल्हेंनी अपघातग्रस्त युवकाला स्वत:च्या गाडीतून हॉस्पिटलला नेलं!
Vivek Kolhe took the accident victim to the hospital in his own car!
विवेक कोल्हे यांच्या माणुसकीच्या एन्ट्रीने वेळ टळली,Vivek Kolhe’s humane entry made time pass.
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Thu 14 Dec 23, 12.00Am.By राजेंद्र सालकर
कोपरगाव : विवेक कोल्हे यांनी स्वतः रुग्णालयात फोन केला आणि डॉक्टरांना जखमीच्या तब्येतीची खबरदारी घेण्याबाबत सूचना दिल्या.
कोपरगाव :कोपरगाव धामोरी फाटा येथे सहकार महर्षी कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्यामधील माणुसकी पहायला मिळाली. बुधवारी (१३ डिसेंबर) रात्री आपल्या गाडीतून जात होते. त्यावेळी कोपरगाव तालुक्यातील धामोरी फाटा येथील साईबाबा मंदिरासमोर एक युवक जखमी अवस्थेत पडला असल्याचे दिसले.विवेक कोल्हे यांनी क्षणाचाही विचार न आपल्या गाडीतून युवकाला हॉस्पिटलमध्ये नेले.
स्वार्थी युगात हरवलेली माणुसकी अन सोशल मीडियाच्या चक्रव्यूहात अडकलेले नेटिझन्स हे सध्याच्या युगाचे दुष्परिणाम आहेत. मात्र काल झालेल्या अपघातात या दोन्ही गोष्टीला तिलांजली मिळाली आहे.
विवेक कोल्हे यांनी स्वतःच्या गाडीतून जखमी युवकाला तातडीने उपचारासाठी चासनळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. त्याचा जीव वाचला.त्यानंतर विवेक कोल्हे यांनी स्वतः चासनळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन त्या जखमी युवकाची भेट घेऊन त्याच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना सदर युवकावर योग्य ते उपचार करण्याच्या सूचना दिल्या.
कोल्हे कुटुंबीय सर्वतोपरी मदत करण्यासाठी नेहमीच पुढे असते हे प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले आहे. याबद्दल विवेक कोल्हे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
या अपघातात युवकावर वेळ पण आली होती” मात्र विवेक कोल्हे यांच्या रूपाने माणुसकीने वेळीच एन्ट्री केल्याने वेळ टळली अन योग्य वेळी उपचार मिळाल्याने त्या युवकाचे प्राण वाचले. यापूर्वीही दोन-तीन वेळेस विवेक कोल्हे यांनी अपघातातील जखमींना स्वतःच्या गाडीतून नेऊन मदत केली आहे व त्यांचे प्राण वाचले आहे.
Post Views:
417