सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी यशवंत पांडे (गुरव) यांची पदोन्नती..
Promotion of Yashwant Pandey (Gurav) to the post of Assistant Sub-Inspector of Police..
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Fir15 Dec 23, 15.00Pm.By राजेंद्र सालकर
कोपरगाव : शिर्डी पोलीस स्टेशन येथे पोलीस नाईक म्हणून कार्यरत असलेले यशवंत भीमराज पांडे (गुरव) यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती झाली. त्याबद्दल कोपरगाव येथील कचेश्वर देवस्थानच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यशवंत भीमराज पांडे (गुरव) हे संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव माथा येथील रहिवाशी असून ते १९९४ साली अहमदनगर येथे पोलीस सेवेत कॉन्स्टेबल म्हणून रुजू झाले. पंधरा वर्षे काम केल्यानंतर त्यांची शिर्डी पोलीस स्टेशन येथे पोलीस नाईक म्हणून बदली झाली. दरम्यान २०१३ मध्ये त्यांनी पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण केली होती. त्यांना मिळालेल्या बढतीबद्दल कोकणठाण येथील कचेश्वर देवस्थानच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. कचेश्वर मंदिर पुजारी माजी ग्रामपंचायत सदस्य व अखिल गुरव समाज संघटनेचे सचिव रमेश क्षीरसागर यांचे ते जावई आहेत.
यावेळी बोलताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यशवंत पांडे म्हणाले की, पोलीस सेवेत आजवर प्रामाणिकपणे केलेल्या कार्याचे हे फलित आहे. हा सन्मान सेवेचा आहे तरुणांनी स्पर्धात्मक परीक्षांचा अभ्यास करावा. यश संपादन करून स्वतःबरोबर देशाचे नाव उज्वल करावे.