नवीन पनवेल येथे रायगड, ठाणे व मुंबई गुरव समाज वधू- वर मेळावा संपन्न – बंडू खंडागळे
Raigad, Thane and Mumbai Gurav Samaj bride-groom gathering held at Navin Panvel – Bandu Khandagale
पहिल्याच मेळाव्यात १०८ तरुण-तरुणींनी दिला परिचय In the very first gathering, 108 young men and women introduced themselves
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Thu28 Dec 23, 19.30Pm.By राजेंद्र सालकर (गुरव)
कोपरगाव : रायगड जिल्ह्यातील नवीन पनवेल येथे श्री बल्लाळेश्वर वधू- वर सूचक यांच्या सहकार्यातून गुरव समाज रायगड, ठाणे व मुंबई संस्था आयोजित महाराष्ट्र राज्यातील गुरव समाज बांधवांसाठी भव्य वधु- वर मेळावा पनवेल येथील सेक्टर- २ जागृती प्रकल्प सभागृह येथे रविवारी (२४) रोजी संपन्न झाला.. पहिल्याच मेळाव्यात १०८ तरुण-तरुणींनी परिचय दिला अशी माहिती गुरव समाज रायगड, ठाणे व मुंबई संस्थेचे अध्यक्ष तथा श्री बल्लाळेश्वर वधु-वर सुचक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष बंडू खंडागळे यांनी प्रास्ताविकात दिली.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून संत काशिबा महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे दीपक दिगंबर पुजारी उपायुक्त न. प. प्र. नवी मुंबई, डॉ. नितीन ढेपे त्वचारोग तज्ञ- संघटक- राष्ट्रीय गुरव समाज महासंघ (महाराष्ट्र), राजेश पवार मुख्य अग्नीशमन अधिकारी भिवंडी महानगरपालिका, शाहू बाळू गुरव सामाजिक नेते, समाजसेवक, तानाजी बाळू गुरव सामाजिक नेते- समाजसेवक- प्रमुख कोकण विभाग, दत्ताजी मसुरकर ज्येष्ठ मार्गदर्शक, मधु पाटील संस्थापक अध्यक्ष अखिल महाराष्ट्र गुरव समाज मुंबई, अमोल गुरव अध्यक्ष अखिल गुरव समाज संघटना रायगड, विजय शिरसागर अध्यक्ष अखिल महाराष्ट्र गुरव समाज मुंबई, रायगड ठाणे व मुंबई उपाध्यक्ष सुभाष गुरव कल्याण यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना उपायुक्त दीपक पुजारी म्हणाले, वधूवर मेळावा ही काळाची गरज असून याचा गुरव समाजाने लाभ घ्यावा.
तर डॉ. नितीन ढेपे म्हणाले, समाजाने समाजासाठी घेतलेला पहिलाच वधू वर मेळावा हा सामाजिक उपक्रम आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे असे आवाहन केले.
यावेळी अनेक मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त करून उपस्थित समाज बांधवांना मार्गदर्शन केले.
अल्पोपहार आणि शेवटी राष्ट्रगीता नंतर कार्यक्रमाची सांगता झाली.उत्तर रायगड जिल्हा युवा अध्यक्ष रूपेश दळवी यांनी सूत्रसंचालन केले. विनायक ढवळे यांनी आभार मानले.
गुरव समाज रायगड, ठाणे व मुंबई संस्थेचे अध्यक्ष तथा श्री बल्लाळेश्वर वधु-वर सुचक मंडळ संस्थापक अध्यक्ष बंडू खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा मेळावा संपन्न झाला.
या मेळाव्याची वैशिष्ट्य म्हणजे पहिल्यांदाच होत असलेल्या या मेळाव्यात ४५० पेक्षा जास्त गुरव समाजातील अनेक समाज बांधव परिचय मेळाव्यासाठी उपस्थित होते.
नव्या जनसेवा सामाजिक विकास संस्था नामफलकाचे अनावरण, त्याचबरोबर नाशिक येथील समाजतारा मासिकाचे संपादक भागवत रावजी गुरव यांच्या पुस्तकाचे अनावरण, दिनदर्शिका २०२४ अनावरण, या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध तुतारी वादक हरिदास गुरव आणि सहकारी यांनी तुतारी वाजून त्याचबरोबर मुंबई-गोरेगाव येथील दिलीप गुरव यांची कन्या हिने अतिशय सुंदर असा बँड वाजून उपस्थित समाज बांधवांचे स्वागत केले.
आयोजक बंडू खंडागळे म्हणाले की,
यापुढेही वधु-वर मेळावे, मुंज, सामुदायिक विवाह सोहळे, आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, त्याचबरोबर अनेक समाज हिताचे कार्यक्रम घेतले जातील.असे आश्वासन दिले. तर या सुंदर कार्यक्रमासाठी अध्यक्ष गुरव विकास प्रतिष्ठान मुंबई, नवल शेवाळे, डॉ. श्रीकांत वाघ- रक्त रोग तज्ञ, बॉम्बे- हिंदुजा- लीलावती- ब्रिज कँडी- हॉस्पिटल, प्रशांत गुरव सहाय्यक- अग्निशमन केंद्र अधिकारी, मीरा-भाईंदर महानगरपालिका, हे काही महत्त्वाच्या कौटुंबिक कारणास्तव कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाही याची खंतही व्यक्त केली.
या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी गुरव समाज रायगड मुंबई कार्याध्यक्ष विजय साळुंखे,माजी अध्यक्ष निरीक्षक रमेश (काका) राजगुरव, उपाध्यक्ष- अमोल गुरव, सहखजिनदार संजय मोरे, सोशल मीडिया प्रमुख- हरेश खंडागळे, सदस्य अमृता ढवळे, पेन येथील स्थानिक समाज बांधव सचिन गुरव, अमोल गुरव, विनायक ढवळे, यांनी विशेष परिश्रम घेऊन सहकार्य केले. या कार्यक्रमासाठी विशेष करून गुरव समाजातील अनेक प्रशासकीय अधिकारी यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अल्पोपहार आणि शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.उत्तर रायगड जिल्हा युवा अध्यक्ष रूपेश दळवी यांनी सूत्रसंचालन केले. विनायक ढवळे यांनी आभार मानले.