नोकरीसाठी माझी निवड याचे सर्व श्रेय हे संजीवनी कॉलेजचे यश – तृप्ती मलिक  

नोकरीसाठी माझी निवड याचे सर्व श्रेय हे संजीवनी कॉलेजचे यश – तृप्ती मलिक

My choice for the job is all due to the success of Sanjeevani College – Tripti Malik

संजीवनीच्या १३ अभियंत्यांना विप्रो परी मध्ये नोकरी; Sanjeevi’s 13 engineers employed at Wipro Pari;

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Wed7 Feb 24, 18.00Pm.By राजेंद्र सालकर

कोपरगांव: संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजने आयआयटी, दिल्ली येथे रोबोकाॅन स्पर्धेसाठी मला संधी दिली त्यातुन मला रोबोटीक्स, ऑटोमेशन , आदी बाबींची आवड निर्माण झाली. त्यामुळे विप्रोपरी या ऑटोमेशन असलेल्या कंपनीच्या सर्व प्रश्नांची सहजगत्या मी उत्तरे देऊ शकले आणि नोकरीसाठी माझी निवड झाली हे कॉलेजचे श्रेय असल्याचे गौरव उद्गार  कासली येथील शेतकऱ्याची मुलगी तृप्ती मलिक हिने व्यक्त केले.

संजीवनी इंजीनियरिंगच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नातून मेकॅनिकल व मेकॅट्राॅनिक्स इंजिनिअरींग विभागातील १३ नवोदित अभियंत्यांची विप्रो परी (प्रिसिजन ऑटोमेशन अँड रोबोटिक्स इंडिया प्रा. लि.) या जगभरातील मोठ्या ऑटोमेशन कंपनीने अंतिम निकाल अगोदरच नोकरीसाठी निवड केले यावेळी बोलताना तृप्ती मलिकेने आपल्या भावना व्यक्त केल्या, अशा संधीमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी कुटुंबाचा आधार बनत आहे, असेही ती म्हणाली
           संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  अध्यक्ष  नितिन कोल्हे यांनी विप्रो परीने निवड केलेल्या सर्व नवोदित अभियंत्यांचे व त्यांच्या भाग्यवान पालकांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच मॅनेजिंग ट्रस्टी  अमित कोल्हे यांनी सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा  छोटेखानी कार्यक्रमात  करून त्यांचे अभिनंदन केले. यावेळी मेकॅट्राॅनिक्स इंजिनिअरींग विभागाचे प्रमुख डाॅ. राजेंद्र कापगते, मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागाचे प्रमुख डाॅ. प्रसाद पटारे व ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट विभागाचे डीन डाॅ. विशाल  तिडके उपस्थित होते.
            विप्रो परीने निवड केलेल्या अभियंत्यांमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरींगच्या प्रतिक श्रीक्रिष्ण  हांडे, यश  दयाराम साळवे, सुमित सजन सानप, रितिका सुनिल वेलगुडे, तृप्ती गोरखनाथ मलिक, अदित्य संतोष  जैन, अजितकुमार वसंत डौले व नयन सजन सानप यांची तर मेकॅट्राॅनिक्स इंजिनिअरींग विभागातील  आदित्य राजेंद्र बढे, साक्षी भाऊसाहेब गीते, प्राची अनिल जाधव, ऋषिकेश  राजेश  काळे व नकुल विजय निबे यांचा समावेश  आहे.

 

 
 
 
 

Leave a Reply

You cannot copy content of this page