कलियुगात चांगल्या व्यक्तींना नेहमीच त्रास सहन करावा लागतो – महंत रामगिरी महाराज.(दुसरे पुष्प) 

कलियुगात चांगल्या व्यक्तींना नेहमीच त्रास सहन करावा लागतो – महंत रामगिरी महाराज.(दुसरे पुष्प) 

Good people always suffer in Kali Yuga – Mahant Ramgiri Maharaj.(Second Flower)

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Tue19 March 24, 8.30 Am.By राजेंद्र सालकर

कोपरगांव : भगवंत आणि भाव याचं एक अतूट नाते आहे. भागवत धर्म नेहमीच चांगली शिकवण देत असतो. कलियुगात चांगल्या व्यक्तींना नेहमीच त्रास सहन करावा लागतो असे विचार गोदावरी धाम (सराला बेट) चे गुरुवर्य महंत रामगिरी महाराज यांनी संगीतमय भागवत कथेचे दुसरे पुष्प गुंफतांना कोपरगाव  अलंकापुरीनगरी येथे  रविवारी (१७) रोजी कथेचे दुसरे पुष्प गुंफतांना केले.

रामगिरी महाराज पुढे म्हणाले की, . गुरु आणि शिष्य दोघेही एकमेकांच्या शोधात असतात. संतांच्या दृष्टीत अमृत असते. आनंदाचे अश्रू हे थंड तर दुःखाचे अश्रू गरम असतात. मन हे अत्यंत लालची व अस्थीर आहे.   लालच ठेऊन केलेला परमार्थ खोटा असतो. भक्ताला भगवंताची भाषा समजत असते.मुर्ख माणसांवर दया करणं कधी कधी महागात पडते, आज स्त्रीच स्त्रीची वैरीन बनली आहे, भ्रूण हत्येचे पाप वाढत आहे.भक्त नेहमीच ईश्वराकडे काहींना काही मागत असतो, भगवंताला भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कधी कधी त्याच्या प्रतिज्ञा मोडाव्या लागतात 
                
  प्रारंभी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी उपस्थीतांचे स्वागत केले.  विवेक कोल्हे यांनी माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या जनकार्याची माहिती दिली.
             
      
            कार्यक्रमस्थळी  माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या १९२९ ते २०२२ या ९३ वर्षाच्या काळातील संजीवनी उद्योग समुहाची उभारणी, जनसामान्य व शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उभारलेली आंदोलने, विविध तत्कालीन पंतप्रधानांबरोबर केलेले कार्य, कुटुंब, आमदारकीचे माध्यमांतून मिळालेले मंत्रीपद, शेतकऱ्यांच्या शेतीला श्वाश्वत पाण्याच्या उपलब्धतेसाठी केलेले बंधारे, साठवण तलाव, राज्य व देशपातळीवर शेतकरी हितासाठी केलेल्या संस्थांची उभारणी, जनकार्यातून मिळालेले पुरस्कार आणि साखर व त्यावर अवलंबून असलेल्या विविध रासायनीक प्रकल्पाची उभारणी असे दहा प्रसंगानुरूप लावण्यात आलेली छायाचित्रे सर्वांचेच आकर्षण बनले आहे, नयनमनोहर फटाक्यांच्या आतषबाजीमुळे परिसर दुमदुमून गेला आहे.

क्षणचित्रे

          या संपूर्ण भागवत कथा सोहळ्याचे डिजिटल चित्रीकरण दोन मोठ्या पडद्यावर दाखवण्यात येत आहे.,  महिला व पुरुष भाविकांना बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे, रामगिरी महाराजांचे कार्यक्रम स्थळी आगमन होताच त्यांच्यावर पुष्पृष्टी करण्यात येते, बच्चे कंपनी उपस्थित भाविकांच्या कपाळी गोपीचंदनाचा टिळा, बुक्का व अष्टगंध लावून वारकरीमय वातावरण निर्मिती करत आहे,  भाविकांना लयबद्ध आरती म्हणता यावी यासाठी त्याची पुस्तिका स्वतंत्ररित्या छापून वाटली, शहर व ग्रामीण भागातील विविध मानाच्या जोड्या आरतीसाठी दररोज पाचारण केल्या जात आहे. महिलांची लक्षणीय गर्दी पहावयास मिळत आहे., विविध धार्मिक साहित्य व ग्रंथांचे स्टॉल या ठिकाणी मांडण्यात आले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page