अध्यात्म व विज्ञानाचा संगम म्हणजेच भागवत- महंत रामगिरी महाराज(३रे पुष्प)
Bhagwat is the confluence of spirituality and science – Mahant Ramgiri Maharaj (3rd Pushpa)
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Tue19 March 24, 19.00 Pm.By राजेंद्र सालकर
कोपरगांव : प्रतिकूल परिस्थीतीत समाधान मानायला शिका, मनांवर ताबा ठेवा, साधना कधी सोडू नका, अध्यात्म व विज्ञानाचा संगम म्हणजेच भागवत होय असे प्रतिपादन श्री गोदावरी धाम (सराला बेट) चे गुरुवर्य महंत रामगिरी महाराज यांनी संगीतमय भागवत कथेचे तिसरे पुष्प गुंफतांना केले.
ते पुढे म्हणाले की, साधुजवळ करूणा पाहिजे, वाईट विचार मनुष्याला नेहमीच हानीकारक असतात. आसन आणि श्वासावर विजय मिळवला की, मन स्थिर होते. हल्ली व्यसनाधिनता वाढत आहे त्यामुळे घरा-घरात कलह तयार होत आहे. संगतीचे दुष्परिणाम नेहमीच अनेकांना त्रासदायक ठरतात. चांगल्या विचाराने चांगलेच होते, वाईट नेहमी घातकच असते., त्यातून मनुष्य दुराचाराकडे ओढला जातो.
भगवंत हा परमात्मा भक्तीप्रिय आहे. मनुष्याला संयमाने जग जिंकता येते तेंव्हा प्रत्येकाने जीवनांत संयमाला महत्व द्यावे, तो नसेल तर सगळं व्यर्थ आहे असे सांगत त्यांनी भागवत स्कंद पुराणातील अनेक गोष्टींचे सौदाहरण स्पष्टीकरण देत शिवस्तुतीने अनेकांना मंत्रमुग्ध करत भक्ताच्या भक्तीत भगवंताला खेचुन आणण्याची ताकद असल्याचे सांगितले.
उर्वरीत चार दिवसात श्रीकृष्ण जन्म, गोवर्धन लिला, रुक्मीणी स्वयंवर, सुदाम चरित्र आदिबाबत विवेचन करणार आहेत.
विवेक कोल्हे यांनी आभार मानले. उपस्थीत भाविकांनी संगिताच्या तलावर भगवंत भक्तीत तल्लीन होत नाचण्याचा मनमुराद आनंद लुटला. याप्रसंगी नयन मनोहर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
Post Views:
55