नांदूर मधमेश्वर बंधाऱ्याला१०  वक्राकार दरवाजे बसविण्यास काळे कोल्हेंचा विरोध

नांदूर मधमेश्वर बंधाऱ्याला१०  वक्राकार दरवाजे बसविण्यास काळे कोल्हेंचा विरोध

Kale Kohle  opposition to installation of 10 curved gates at Nandur Madhameshwar dam

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Thu 21 March 24, 19.50 Pm.By राजेंद्र सालकर

कोपरगाव : नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यावरील आठ दरवाजांचा पुर्वानुभव पहाता नांदुर मधमेश्वर बंधाऱ्याचे नव्याने टाकण्यात येणारे दहा दरवाजे वक्राकार दरवाजे हे गोदावरी कालव्यांना शाप  ठरणार असल्याने आ आशुतोष काळे व माजी आमदार स्नेहलता कोल्हे  यांनी वेगवेगळ्या पत्रकाद्वारे कडाडून विरोध केला आहे

जलसंपदा विभाग नवीन १० दरवाजे बांधण्यासाठी निविदा काढून जी तत्परता दाखवली जात आहे,असा दावा  आमदार आशुतोष काळे व  माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केला आहे. जलसंपदा विभागाची ही  तत्परता  गोदावरी कालवे लाभधारकांसाठी अन्यायकारक असुन हा निर्णय घेऊन जखमेवर मीठ चोळण्यात येत आहे, अशी लाभधारकांची भावना आहे . काळे कोल्हे यांनी म्हटले आहे.
पूरस्थितीने बाधित होणाऱ्या गोदाकाठच्या गावांसाठी राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने नांदूर मधमेश्वर धरणावर नदीच्या तळालगत नव्याने वाढीव १२ मीटर बाय ८ मीटर आकाराचे १० वक्राकार दरवाजे बांधण्यास मान्यता दिली असून या निर्णयाला न्यायालयात आव्हान देणार आहे. हा निर्णय गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रावर अन्याय करणारा असून त्या विरोधात न्यायालयीन लढाई बरोबरच राजकीय लढाई देखील लढू असा ईशारा आ.आशुतोष काळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.
 निफाड परिसरातील गावांना पावसाळ्यात पुराचा धोका पोहोचतो हे कारण पुढे करत नांदुर मध्यमेश्वर बंधा-यास जास्तीचे वक्राकार दरवाजे बसवावे अशी निफाडकरांनी केलेली मागणीच शास्त्रोक्त नाही परिणामी गोदावरी डावा आणि उजव्या कालव्यावरील शेतक-यांच्या शेतीस पाणीच मिळणार नाही तेंव्हा या बंधा-यास दहा वक्राकार दरवाजे बसवू नये अशी मागणी माजी आमदार सौ स्नेहलता कोल्हे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली

कोट 

बारमाही ब्लॉकच्या नावाखाली लँड सिलींग कायद्यान्वये जास्तीच्या जमिनी गेल्या व ५० टक्के ब्लॉक्स देखील रद्द करून गोदावरी कालव्यांच्या लाभधारक शेतकऱ्यांवर दुहेरी अन्याय झाला असतांना पुन्हा तिहेरी अन्याय सहन करण्याची क्षमता गोदावरी कालव्यांच्या लाभधारक शेतकऱ्यांची राहिलेली नाही. त्यामुळे लाभधारक शेतकऱ्यांसाठी न्यायालयीन लढाई तर लढतच आहे परंतु त्याचबरोबर राजकीय लढाई देखील लढणार  – आ. आशुतोष काळे 

कोट 

वाढत्या बिगरसिंचन पाण्यामुळे गोदावरी कालव्यांना सध्याच पाटपाण्यांचे आर्वतन नीट होत नाही, टेलसह वरच्या भागातील शेतक-यांच्या शेती पिकांना पाणीच मिळत नाही,  समन्यायी पाणी वाटपाच्याकायद्यामुळे बारमाही गोदावरी कालवे लाभधारक शेतकरी, फळबागा, शेती पिकेउध्दवस्त झाली आहे आणि आता पुन्हा त्यांच्यावर वरवंटा फिरविला जात आहे हे बरोबर नाही. तंत्रज्ञान प्रगत झालेले असतांना अगोदर त्याचा वापर करा आणि नांदुर मध्यमेश्वर बंधा-यास दहा वक्राकार दरवाजे बसविण्याचा घाट तात्काळ बंद करावा – सौ स्नेहलता कोल्हे 

Leave a Reply

You cannot copy content of this page