कोपरगाव : कोळपेवाडीमध्ये प्रियकराची हत्या करून अल्पवयीन प्रेयसीवर बलात्कार;
Kopargaon: In Kolpewadi, minor girlfriend was raped after killing boyfriend;
एकाला अटक, दोन फरार सात दिवसांची पोलिस कोठडी One arrested, two absconding seven days in police custody
दोन महिन्यांनी तक्रार दाखल, दोन तासात मुख्य आरोपी अटक Complaint was filed after two months, main accused arrested within two hours
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Thu 21 March 24, 19.30 Pm.By राजेंद्र सालकर
कोपरगाव : तालुक्यातील कोळपेवाडी येथे पत्नी व मित्राच्या सहकार्याने प्रियकर तरूणाची हत्या केली व त्याच्या अल्पवयीन प्रेयसीवर बलात्कार केला.गुरूवारी (दि १४) जानेवारी २४ रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. नागेश उर्फ नाग्या शिवराम चव्हाण (वय २३) रा.जेऊरपाटोदा असे हत्या झालेल्या तरूणाचे नाव आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तर दोन जण फरार झाले आहेत.
याबाबतची माहिती अशी की, पिडिता ही बाहेर गावची असल्याने तिने तब्बल दोन महिन्यांनी (दि २१) मार्च रोजी दुपारी ४.२४ वाजता कोपरगांव पोलीस ठाण्यात येवून आरोपी अर्जुन उर्फ भुर्ज्या गोपाल पिंपळे रा. कोळपेवाडी त्याचा मित्र भाऊ (पूर्ण नाव माहित नाही) व चांदणी पिंपळे सर्व रा.कोळपेवाडी यांचे विरुद्ध दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, मयत नागेश उर्फ नाग्या शिवराम चव्हाण (वय २३) रा.जेऊर पाटोदा कोपरगाव याचे व फिर्यादी बरोबर प्रेमसंबंध होते. मयताने फिर्यादीस त्याचे मोटर सायकलवर कोळपेवाडी येथे त्याचा मित्र अर्जुन पिंपळे उर्फ भुर्ज्या व चांदणी पिंपळे यांचे घरी घेवून गेला होता. (दि १३) जानेवारी रोजी मयत नागेश व अर्जुन पिंपळे हे एका खोलीत तसेच फिर्यादी व आरोपी चांदणी पिंपळे वेगळया खोलीत झोपले असता यातील मयत नागेश हा (१४) जानेवारी रोजीचे पहाटे ४ ते ५ वा. दरम्यान फिर्यादीचे जवळ गेला व तिच्याशी लगट करु लागला त्याचा आवाज ऐकून चांदणी पिंपळे ही देखील फिर्यादीजवळ गेली तेंव्हा मयत नागेश व आरोपी अर्जुन यांच्यात भांडणे सुरु झाली घरात भांडण चालू झाल्याने चांदणी आरोपी अर्जुनचा मित्र भाऊ यास बोलावून घेतले त्यानंतर पहाटे ५ वा. दरम्यान आरोपीचा भाऊ याने मयत नागेश उर्फ नाग्या शिवराम चव्हाण यास खाली पाडून त्याचे दोन्ही हात दाबून ठेवले नंतर आरोपी अर्जुन याने मयतास जीवे मारण्याच्या हेतुने त्याचा दोरीने गळा आवळून खुन केला तसेच त्याने फिर्यादीस चाकूचा धाक दाखवून तिच्या सोबत बळजबरीने लैंगिक संभोग करुन कोंडून ठेवले त्याला आरोपी चादणी पिंपळे हिने मदत करुन मयताचे प्रेतास बांधण्यासाठी साडी आणली. वरील सर्व आरोपींनी संगनमताने मयताचे प्रेत गोणीत भरुन साडीने बांधून प्रेत कोठेतरी पाण्यात टाकून प्रेताची विल्हेवाट लावली व पुरावा नष्ट केला म्हणून आरोपी अर्जुन पिंपळे, भाऊ (पूर्णनांव माहित नाही) व चांदणी पिंपळे सर्व रा.कोळपेवाडी यांचे विरुद्ध खुनाचा तसेच पोस्को कायद्याखाली गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलीस निरिक्षक संदिप कोळी हे पुढील तपास करीत असून यात गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या दोन तासात कोपरगाव ग्रामीण पोलिसांनी मुख्य आरोपी अर्जुन पिंपळे यास. काल (दि२१) मार्च ६.४४ वाजता कोळपेवाडी येथून अटक केली आहे. प्रभारी पोलिस उप अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी घटनास्थळी भेट दिली पोलीस ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी हे पुढील तपास करीत आहेत
Post Views:
76