मोदी यांच्याकडून बचत गटाच्या कामाची दखल ही प्रेरणा देणारी:= सौ. स्नेहलता कोल्हे

मोदी यांच्याकडून बचत गटाच्या कामाची दखल ही प्रेरणा देणारी:= सौ. स्नेहलता कोल्हे

Modi’s recognition of the work of self-help groups is inspiring:= Mrs. Snehlata kohle

Rajendara C. Salkar,News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! ,Mon26 Aug 19.00 Am.By सालकर राजेंद्र

कोपरगाव : रविवारी जळगाव येथील प्राइम इंडस्ट्रियल पार्क मैदानात पंतप्रधान मोदी यांनी महिला बचत गटाच्या कामाची दखल घेतली . यावर माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी सामाजिक भावनेतून गेल्या वीस वर्षापासून करीत असलेल्या महिला बचत गटाच्या कामाला आणखी प्रेरणा मिळाले असल्याचे असल्याच्या प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केल्या

आमच्या संजीवनी स्वयंसहायता महिला बचत गटाच्या माध्यमातून जवळपास तीस ते पस्तीस हजार महिलांचे संघटन आणि हजारो बचत गट यशस्वीपणे सुरू आहे.या गोष्टींची दखल देश आणि राज्यपातळीवर घेतली जाते याचा विशेष आनंद आहे.कारण सद्या मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल माझ्या महिला भगिनी या माध्यमातून करू लागल्या.घर आणि काम यात व्यस्त असणारी गृहिणी स्वतः बँकेचे व्यवहार हाताळू लागली.बचत गटांच्या माध्यमातून उद्योग व्यवसाय उभारले गेले.बँकेचे खाते उघडण्यापासून केलेली ही सुरुवात आज कोट्यावधी रुपयांचे कर्ज बचत गटांना वितरण करताना केलेल्या संघटनाचे सार्थक वाटते.

गावोगावी स्त्री शक्तीचे महत्व पटवून देत गटांच्या स्थापना जवळपास वीस वर्ष आधी सुरू केल्या त्यांची संख्या आज हजारोंच्या घरात आहे.महिला बचत गटाच्या चळवळीतून हजारो महिला स्वावलंबी झाल्या.अनेकांचे प्रपंच सावरण्यासाठी मदत झाली तर अनेक भगिनींनी आपल्या मुलांना चांगले शिक्षण दिले.महिला सबलीकरण ही काळाची गरज आहे त्याचा आदर्श सर्वांनी घेण्यासाठी महिला बचत गटांचे संघटन उपयुक्त ठरणार आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page