गोविंदा आला रे! आ. आशुतोष काळेंच्या ‘वचनपूर्तीच्या दहीहंडीला’ गौतमी पाटील येणार
Govinda came! come Gautami Patil will come to Ashutosh Kale’s ‘Vachanpurti Ki Dahi Handi’
गर्दीचा उच्चांक मोडणार आयोजकांचा दावाThe organizers claim that the peak of the crowd will break
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! Tue,267 Aug 19.00 Am.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील गुरुवारी (दि.२९) ला आमदार आशुतोष काळे यांच्या ‘ वचनपूर्तीच्या दहीहंडीला’आपली उपस्थिती लावणार आहे. तर गर्दीसमोर जबरदस्त परफॉर्मन्स करून गोविंदा पथकांसह प्रेक्षकांचा उत्साह वाढवणारअसल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या दहीहंडी उत्सव समितीचे अध्यक्ष सचिन गवारे यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे.
राज्यसह देशात गोकुळाष्टमी निमित्त मंगळवारपासून दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात व उत्साहात सुरू झाला आहे. राजकीय पक्ष, व नेत्यांकडून दिमागदार दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईप्रमाणे गोविंदांना प्रोत्साहित करण्यासाठी व गर्दी करण्यासाठी मुंबईच्या धर्तीवर कोपरगावात देखील दरवर्षी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या दहीहंडी उत्सवाला चित्रपटसृष्टीतील कलाकार उपस्थित राहून हजेरी लावत आलेले आहेत. यावर्षी नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या उपस्थितीत भव्य दिव्य अशा ‘वचनपूर्तीची दहीहंडी’ उत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे.
आ. आशुतोष काळे यांनी आपल्या कार्यकालात मतदार संघाच्या विकासासाठी ३००० कोटीचा निधी आणला असून कोपरगाव मतदार संघाची वेगळी ओळख जिल्ह्यासह राज्यात निर्माण केली आहे. त्यामुळेच यावर्षीची दहीहंडी “वचनपूर्तीची दहीहंडी” म्हणून साजरी करण्यात येत आहे. गुरुवारी (दि२९) रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान या ठिकाणी होत असलेल्या या दहीहंडीसाठी स्वतः आ. आशुतोष काळे उपस्थित राहणार आहेत. यावर्षी दहीहंडीचे आकर्षण नृत्यांगना गौतमी पाटील असून गोविंदा पथकासाठी ही आकर्षक बक्षिसे ठेवली आहे त्यामुळे निश्चितच कोपरगावातील कार्यक्रमाच्या गर्दीचे उच्चांक मोडीत निघतील अशी आशा सचिन गवारे यांनी व्यक्त केली.
Post Views:
56