आ. काळेंच्या सूचनेवरून रविवारपासून तीन दिवसाआड पाणी – सुहास जगताप

आ. काळेंच्या सूचनेवरून रविवारपासून तीन दिवसाआड पाणी – सुहास जगताप

come According to Kalen’s instructions, water every three days from Sunday – Suhas Jagtap

आता लक्ष चार नंबर तलावाकडे- आ.आशुतोष काळे

Rajendara C. Salkar,News Portal, वृत्तवेध ऑनलाईन!Thu18, Sep 14.10 Am.By सालकर राजेंद्र

कोपरगाव:आ. आशुतोष काळे यांनी दिलेल्या सूचनेवरून रविवार (दि.२२) पासून कोपरगावकरांना तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली .

 मंगळवारी (दि.१७) रोजी अनंत चतुर्थीच्या दिवशी आ. आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत साई तपोभूमी कार्यालयातील सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये मुख्याधिकारी सुहास जगताप बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

मुख्याधिकारी सुहास जगताप म्हणाले पाणी पुरवठ्याचे दिवस अजून कमी होवून नागरिकांना नियमित पाणी देण्यासाठी नागरिकांनी आपले नळ कनेक्शन जुन्या पाईपलाईनवरून नवीन योजनेच्या पाईपलाईनवर जोडणी करावी. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी आपल्या नळाला तोट्या बसवून घ्याव्यात यासाठी नगरपालिकेकडून प्रबोधन करण्यात येणार असून लवकरात लवकर नियमित पाणी देण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी आ. आशुतोष  काळे यांना दिली.                         
 यावेळी पत्रकारांशी बोलताना आ आशुतोष काळे म्हणाले की, १३१.२४ कोटी निधीतून बांधण्यात आलेला ५ नंबर साठवण तलाव पूर्ण झाला असून वितरण व्यवस्थेच्या सुरु असलेल्या कामाबाबत सविस्तर माहिती कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास जगताप यांच्याकडून जाणून घेतली असता कोपरगावकरांचे बहुतांश नळ कनेक्शन अजूनही जुन्या पाईप लाईनवर आहे. नगरपरिषदेच्या माध्यमातून ते नळ कनेक्शन नवीन पाईप लाईनवर शिफ्ट करण्याचं काम तातडीने हाती घ्यावे. जेणेकरून वितरण करतांना अडचण येणार नाही अशा सूचना दिल्या.                         
चौकट 
कोणीही कितीही अफवा पसरविल्या व कोणी कितीही अडचणी आणल्या तरी आ. आशुतोष काळे यांनी ५ नंबर साठवण तलावाचे काम पूर्णत्वाकडे घेवून जात जलपूजन देखील केले आहे. त्यानंतर विरोधकांना अफवा पसरविण्यासाठी अजिबात संधी न देता उर्वरित एक ते चार तळ्यांचे काम देखील हाती घेणार असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले.

Leave a Reply

You cannot copy content of this page