पाचवर्षात आपण केलेली कामे घराघरात पोहचवा – आ. आशुतोष काळे

पाचवर्षात आपण केलेली कामे घराघरात पोहचवा – आ. आशुतोष काळे

Deliver the work you have done in five years to the house – come. Ashutosh Kale

जिनिंग प्रेसिंग सोसायटीची ६३ वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

Rajendara C. Salkar,News Portal, वृत्तवेध ऑनलाईन!Thu18, Sep 14.00 Am.By सालकर राजेंद्र

कोपरगाव: आपण पाच वर्षात सर्वच स्तरातील लोकांना समाजाला रस्ते, पाणी, वीज, समाजमंदिर, देवस्थान या पद्धतीतून न्याय देण्याचा प्रयत्न केला. शहरासाठी पाच नंबर साठवण तलाव बांधला आता प्रचाराला लागा गाफील राहू नका, आपण केलेली कामे घराघरात पोहोचवा असे आवाहन आ. आशुतोष काळे यावेळी यांनी यावेळी उपस्थित सभासदांना केले.

तालुका सहकारी कापूस जिनिंग अँड प्रेसिंग सोसायटीची सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाची ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवारी(१६ सप्टेंबर) रोजी दुपारी ३ वाजता संस्थेचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली त्यावेळेस प्रमुख पाहुणे म्हणून व संस्थेचे मार्गदर्शक आ आशुतोष काळे हे बोलत होते.
यावेळी जिनिंग संस्थेच्या वार्षिक सभेच्या अध्यक्षपदाची सूचना नानासाहेब चौधरी यांनी मांडली सूचनेस संदिप शिंदे यांनी अनुमोदन दिले. 
प्रास्ताविक करतांना संस्थेचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार म्हणाले की, मागील काही वर्षात कापसाचे उत्पादन कमी झाल्यामुळे जिनिंग प्रेसिंग प्रक्रिया कामकाज होऊ शकले नाही मात्र दूरदृष्टी असणाऱ्या मा. खा. कर्मवीर शंकरराव काळे यांनी जिनिंग प्रेसिंग सोसायटीला अनेक पूरक व्यवसाय करण्यासाठी पाठबळ दिल्यामुळे मा. आ. अशोक काळे व कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आ. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. चालू आर्थिक वर्षात संस्थेला ७९ लाख ७८ हजार ३५९ रुपयांचा नफा झाला असून लेखा परीक्षणातून संस्थेला याहीवर्षी ऑडिट  वर्ग ‘अ’ मिळालेला असल्याची माहिती दिली.
अहवाल वाचन संस्थेचे जनरल मॅनेजर सुरेश काशीद यांनी केले. सभेस उपस्थित असलेले सभासद यांनी विषय पत्रिकेवरील सर्व विषय मंजूर करण्याची सर्व सभासदांच्या वतीने सूचना संचालक अशोकराव मुरलीधर काळे यांनी मांडली त्या सूचनेस  यांनी सभासद शिवाजी देवकर अनुमोदन दिले. संस्थेचे संचालक महेश लोंढे यांनी २०२३-२४ या आर्थिक वर्षात निधन झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुलाब शेख यांनी केले तर संचालक  संजय संवत्सरकर यांनी आभार मानले..
यावेळी बोलताना आ. आशुतोष काळे म्हणाले, सरकारच्या धोरणामुळे अडचणीत आलेल्या जिनिंगला वेगवेगळे व्यवसाय सुरू करावे लागले. कारखान्याने हातभार लावला म्हणून ही संस्था आज जिवंत दिसत आहे मॅनेजर व कर्मचारी यांचे उदरनिर्वाह चालू आहे कर्मवीर शंकरराव काळे यांनी अवघड परिस्थितीतही संस्था टिकवली, वाढवली  आपणही त्याच पद्धतीने संस्था सुरू ठेवण्याचे प्रयत्न करीत आहोत. अडचणी आहेत आडकाठी घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत त्यात शाश्वत उत्पन्न नसल्याने प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकतो आहोत, असे ते म्हणाले, 
चौकट
 जिनिंगची सभासद संख्या १४५० आहे त्यात एक हजार रुपये शेअर्स सभासद संख्या ३७८ आहे तर  उर्वरित शंभर रुपये शेअर्स सभासदांची संख्या १०७२ इतकी आहे मुळात सभासद संख्या कमी असून शेअरची रक्कमही कमी आहे यावर विचार करण्याची गरज असून सभासद आणि शेअरची रक्कम वाढविण्याची गरज आहे.  ज्यांचा शेअर शंभर रुपयाचा आहे त्यांनी तो हजार रुपयांपर्यंत करावा किमान त्यांना वर्षाला मिठाई तरी देता येईल,- आ आशुतोष काळे 

 

Leave a Reply

You cannot copy content of this page