कोल्हेंनी महायुतीचा धर्म पाळुन वरिष्ठांना दिलेला शब्द खरा केला – सौ स्नेहलता कोल्हे
Kolhe kept his word to his superiors by following the religion of the Mahayuti – Mrs. Snehlata Kolhe
कोपरगांवसह राज्यात पुन्हा महायुतीच, देवेंद्र फडणवीस किंगमेकर विवेक कोल्हेMahayuti is back in the state including Kopargaon, Devendra Fadnavis is kingmaker Vivek Kolhe
कोपरगाव मतदारसंघात जपलेल्या महायुतीचा आदर्श कौतुकास्पद
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! , Sat23 Nov 19.40 Am.By सालकर राजेंद्र
कोपरगांव : कोल्हे कुटुंबाने घेतलेल्या भूमिकेमुळे मोठे मताधिक्य देऊन महायुतीचे उमेदवार आशुतोष काळे यांचा विजय हा
कोल्हेंनी महायुतीचा धर्म पाळुन वरिष्ठांना दिलेला शब्द खरा करून दाखविला अशा प्रतिक्रिया भाजपा प्रदेश सचिव माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी दिल्या,यात सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले याचा अभिमान आहे . असेही त्या म्हणाल्या,
कोपरगाव शहरात महायुतीचा महाविजय युवानेते विवेक कोल्हे यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी,पेढे भरवत ढोल ताशाच्या गजरात घोषणांनी आनंदोत्सव साजरा केला.यावेळी बोलताना विवेक कोल्हे यांनी भाजपा महायुतीचे ऐतिहासिक विजयाचे क्षण आनंद देणारे आहे.देशाचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी,गृहमंत्री अमित शाह,राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा,राज्यातील खंबीर नेतृत्व देवेंद्र फडणवीस,प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा हा करिष्मा आहे.
कोपरगाव मतदारसंघात ऐतिहासिक विजय मिळवला या युतीधर्माचा आदर्श राज्यभर घेतला जाईल असा विश्वास व्यक्त करत सर्व महायुतीचा उमेदवारांचे अभिनंदन केले आहे.यावेळी भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीतील गाफीलपणा विधानसभेच्यावेळी दुर करून अवघ्या तीन महिन्यांत मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना आणून ती तळागाळापर्यंत नेवन केंद्राची आर्थीक ताकद राज्यात उभी करायची असेल तर महायुतीशिवाय पर्याय नाही हा संदेश देत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य पिंजुन काढत महायुतीच्या सर्वच उमेदवारांसाठी जीवाचे रान करून काम केले त्यामुळे कोपरगांव विधानसभा मतदार संघासह राज्यात पुन्हा महायुतीच सत्तेवर आली यात माजी मुख्यमंत्री देवाभाऊ किंगमेकर असुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्वच मित्र पक्षांचे सहकार्य मिळाले अशी प्रतिक्रिया माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी देत सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले.
स्नेहतला कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे प्रतिक्रिया देताना महाराष्ट्र राज्यात सर्वच जाती पंथाचे लोक गुण्या गोविंदांने राहतात, त्यांची सुख-दुःखे काय आहेत याचा प्रामाणिकपणे प्रतिशोध घेत भारतीय जनता पक्ष नेतृत्व, तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह सर्वच घटकांनी ते निवारण करण्याचे काम केले व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अभिप्रेत असणारा महाराष्ट्र घडविण्यांसाठी कार्यकर्त्यांनी जीवाचे रान केले त्यामुळेच राज्यात तिस-यांदा महायुतीची सत्ता स्थापन झाली.
महिला ही शक्ती आहे. बचतगटाच्या माध्यमांतुन त्यांना पाठबळ देत माता भगिनींसाठी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना भारतीय जनता पक्षांने आणली ते खरे या यशाचे मुख्य गणित आहे.कोपरगाव मतदारसंघांत मोठे काम भाजपाकडून करण्यात आले होते त्याचाही फायदा या निवडणुकीत झाला.
स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी बारा बलूतेदारांना बरोबर घेत स्वराज्य उभारले त्याच पावलावर पाउल ठेवत भारतीय जनता पक्ष व मित्र पक्षाने या विधानसभेच्या निवडणुकीत रणनिती आखून महायुतीच्या उमेदवारांच्या विजयासाठी चंग बांधला, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विकासाचा धडाका, केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा यांचा प्रचारादरम्यानचा मास्टरस्ट्रोक, विरोधकांच्या फेक नरेटिव्हला जशास तसे उत्तर आणि राज्य ते गांवपातळीपर्यंत केलेल्या विकासाची सुत्री मतदारांपर्यंत पोहोचविल्याने राज्यात तिस-यांदा सत्तेच्या चाव्या महायुतीकडे आल्या आहेत.
कोपरगांव विधानसभा निवडणुकीत येथील महायुतीचे उमेदवार आमदार आशुतोष काळे यांच्या विजयासाठी पक्ष नेतृत्वांशी युतीधर्माबाबत झालेल्या चर्चेप्रमाणे संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली तंतोतंत पालन करत महायुती धर्म दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांत रूजविण्यांसाठी प्रामाणिक प्रयत्न केले त्यामुळेच त्यांचे मताधिक्य अपेक्षेप्रमाणे मिळाले आहे असेही सौ. स्नेहलता कोल्हे शेवटी म्हणाल्या.
Post Views:
38