५० वर्षांनी भेटलेल्या मित्र- मैत्रिणींचे डोळे पाणावले; स्नेहसंमेलनातुन माजी विद्यार्थ्यांनी दिला आठवणींना उजाळा !

५० वर्षांनी भेटलेल्या मित्र- मैत्रिणींचे डोळे पाणावले; स्नेहसंमेलनातुन माजी विद्यार्थ्यांनी दिला आठवणींना उजाळा !

Tears welled up in the eyes of friends who met after 50 years; Former students reminisced at a reunion!

Rajendara C. Salkar,
News Portal, वृत्तवेध ऑनलाईन!  , Wed8 Jan  18.20 Am.By  सालकर राजेंद्र

कोपरगाव:विद्यार्थी व शिक्षक यांनी एकमेकांशी संवाद साधला विद्यार्थ्यांचे कार्य कर्तुत्व ऐकताना शिक्षकांच्या चेहऱ्यावर गर्व दिसत होता ५० वर्षांनी भेटलेल्या मित्र- मैत्रिणींचे डोळे पाणावले; स्नेहसंमेलनातुन माजी विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी आठवणींना उजाळा दिला.

मित्र म्हटले कि गप्पा आणि शाळेतील बालपणीचे मित्र म्हटले कि आठवणींना उजाळा. अशाच प्रकारे कोपरगाव तालुक्यातील सोमैय्या स्कुलच्या १९७६ ते १९९७ च्या माजी विद्यार्थ्यांनी शनिवारी (४) जानेवारीला येत आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला आहे. यावेळी विद्यार्थी आणि शिक्षक यांनी एकमेकांशी संवाद साधत पाणावलेल्या डोळ्यांनी व गहिवरलेल्या आवाजाने शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला. विद्यार्थ्यांचे कार्यकर्तृत्व ऐकताना शिक्षकांच्या चेहऱ्यावर गर्व आणि समाधान दिसून येत होता विद्यार्थ्यांच्या तोंडून शिक्षकांबद्दल आपल्या काय भावना होत्या याची कबुली ऐकून शिक्षकही भारावून गेले.

१९७६ साल पासुन १९९७ सालच्या १० वी च्या विद्यार्थ्यांनी तब्बल ५० वर्षांनंतर एकत्र येऊन स्नेहसंमेलन साजरे केले. त्यावेळचे तरुण विद्यार्थी आज जरी वृद्ध अवस्थेत असले तरी त्यांच्या आठवणी आजही ताज्या असल्याचे या निमित्ताने पहायला मिळाले. यावेळी ५० वर्षांपूर्वी त्यांना शिकवणारे बीबी पाटील सर, शिरसाट सर, शिंदे सर क्षेत्रे सर राऊत गुरुजी, पवार काका हे शिक्षक तसेच गोदावरी बायोरिफायनरी प्रा.लि.चे सेक्रेटरी सुहास गोडगे साहेब,कु.अश्विनी शेळके मॅडम, गणेश पाटील , शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष नामदेव जाधव व उपाध्यक्ष पत्रकार प्रशांत टेके आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

ही या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. ५० वर्षानंतर पुन्हा आपल्या शाळेच्या बाकावर बसून कसे वाटते असे यातील एका विद्यार्थिनीला विचारले असता, त्यावेळी लहान होती. आता मोठी झाली आहे. त्यामुळे बाक बसण्यासाठी लहान झाला आहे. एव्हढ्या वर्षानी पुन्हा एकत्र येऊ असे वाटले नव्हते. मात्र आज सर्वजण पुन्हा एकत्र पाहून डोळ्यांत आनंदाश्रू येत असल्याची प्रतिक्रिया दिली. काहीनी आमच्या काळात शाळेत एवढ्या सोयी नव्हत्या याची खंत व्यक्त केली.

 

शाळेतील आठवणी नेहमीच हव्याहव्याशा वाटतात. मात्र शिक्षणाचे पुरेसे धडे घेतल्यानंतर प्रत्येक विद्यार्थी आपल्या कामाधंद्यामध्ये व्यस्त होतो. नवनवीन मित्र-मैत्रिणी आयुष्यात येत असतात. मात्र शाळेतील मित्र आणि त्याच्या सोबतचे क्षण हे विसरता येत नाहीत. नेहमीच आपण आपल्या शाळेतील आठवणी एकमेकांशी शेअर करत असतो. अशाच शालेय मित्रांनी एकत्र येऊन, स्नेहसंमेलन साजरे करून आपल्या शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देण्याची कल्पना किती सुंदर असते हे साकरवाडीमधील सोमैय्या. हायस्कुलमध्ये शनिवारी पहायला मिळाले आहे.

चौकट- मनोगत

शाळा आणि शाळकरी वय खोडसाळपणाचं असतं… ते जगता आले याचा आनंद आहे हे बाकी आयुष्य मात्र केवळ सभ्यता आणि आदरात घालवले गेले.

प्रिय स्नेही वर्ग व शाळा बंधुनो,

समृद्ध यशस्वी जीवन जगण्यासाठी आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संघर्षाला तोंड देत संसाराचा गाडा हाकताना आयुष्यात ‘धन’ आणि ‘ऋण’ यांच्याशी गट्टी जमवत तडजोडीची आकडेमोड करून आयुष्याचं गणित मांडताना आठवण यायची ती शाळेतील दिवसांची त्या वर्ग मित्रांची आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर भेटेल ती माणसे जोडण्याच्या वेड्या ध्यासांमुळे अनेक शाळकरी जिवलग मित्र या सर्वांचा कुठेतरी विसर पडत गेला. या माझ्या जीवनाच्या यशात अपयशात सर्वं स्नेही , आदरणीय प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष माझे शिक्षक गुरु आणि माझें आई-वडील व सदैव माझ्या पाठीशी खंबीर पणे राहणारी माझी अर्धांगिनी !.. आज पुन्हा या शाळेच्या प्रांगणात सुमारे पन्नास वर्षानंतर स्नेह मेळावातून आपुलकी ,स्नेह , विचारांची देवाण-घेवाण आणि व्यावसायिक उपक्रम आदान प्रदानामुळे आज मी स्वःता ला खूप भाग्यवान तसेच सर्वोत्तम मित्र संपती असल्याचा अभिमान बाळगतो.आणि “जुनी मैत्री” ही पेन्शनसारखी असते. निवृत्तीनंतरही (रिटायरमेंट) ती चालत राहते!पन्नास वर्षानंतर स्नेह मेळाव्याच्या माध्यमातून सर्वांना एकत्र करणाऱ्या आयोजक यांचा ऋण निर्देश यानिमित्ताने व्यक्त करतो.| – पत्रकार राजेंद्र सालकर …

या मेळाव्याचे प्रास्ताविक विद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सौ सुनीता पारे यांनी तर सूत्रसंचालन श्रीमती निकम मॅडम,नागरे मॅडम, गायकवाड सर यांनी केले. माजी शिक्षकांचा परिचय राऊत सर यांनी तर शेवटी आभार खटावकर सर यांनी व्यक्त केले. या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी,स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले. मेळाव्यासाठी दिल्लीपासून ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page