लोकशाही व्यवस्थेतून पत्रकार बाजूला झाल्यास त्यादिवशी लोकशाही संपलेली असेल  –  विलास बडे

लोकशाही व्यवस्थेतून पत्रकार बाजूला झाल्यास त्यादिवशी लोकशाही संपलेली असेल  –  विलास बडे

If journalists are excluded from the democratic system, democracy will be over on that day – Vilas Bade

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन!  , Sun12 Jan 25  16.30 Am.By  सालकर राजेंद्र

कोपरगाव: पत्रकारिता समाजाचा कणा असून सामान्य माणसाचा आवाज आहे त्यामुळे सामान्य माणसाचा विश्वास संपादन करणं आणि तो टिकवून ठेवणं ही पत्रकाराची जबाबदारी आहे आणि आपला आवाज टिकवणे व्यवस्थेची आणि त्याचबरोबर सामान्य माणसाची सुद्धा जबाबदारी आहे तरच हीलोकशाही टिकणार आहे ज्या दिवशी या व्यवस्थेतून पत्रकार बाजूला होईल त्या दिवशी फक्त आणि फक्त बजबजपुरी माजलेली असेल आणि या देशात लोकशाही संपलेली असेल ज्येष्ठ पत्रकार विलास बडे यांनी रविवारी कोळपेवाडी येथे कर्मवीर शंकरराव काळे कारखाना  स्थळावर रविवारी 12 जानेवारी रोजी सकाळी आयोजित पत्रकार सत्कार समारंभात केले अध्यक्षस्थानी आ. आशुतोष काळे होते.

प्रारंभी बाळशास्त्री जांभेकर कर्मवीर शंकरराव काळे सौ सुशिलामाई  काळे यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले

पुढे बोलताना ज्येष्ठ पत्रकार विलास बडे म्हणाले पत्रकारितेला जरी संविधानात चौथा स्तंभ म्हटले नसलं तरीही आजही सगळी व्यवस्था  ही लोकशाही पत्रकारितेच्या त्या स्तंभावरती आहे कधी फक्त विचार करून बघा हा स्तंभ ज्या दिवशी बाजूला होईल त्या दिवशी या देशांमध्ये  अराजकता माजेल. ही पत्रकारिता तुम्ही सगळ्यांनी आज पर्यंत जीव धोक्यात घालून, पोटाला चिमटा काढून सुद्धा तुम्ही जिवंत ठेवलेली आहे जाताना फक्त एक आवाहन करतो हे पत्रकारिता जिवंत ठेवताना आपण जिवंत राहणं सुद्धा तितकच गरजेच आहे आणि हे जिवंत राहण्यासाठी आपण आपल्या चरितार्थासाठी एखादा व्यवसाय एखादा उद्योग किंवा आपलं जे व्यावसायिक अर्थकारण आहे ते सुद्धा सांभाळणं तितकच गरजेचं आहे त्यासाठी पत्रकार उद्योजक बनला पाहिजे पत्रकारांनी आयुष्यामध्ये व्यावसायिक बनले पाहिजे व त्याने स्वतःचे एक साम्राज्य  निर्माण केलं पाहिजे त्याचं वर्तमानपत्र असले पाहिजे त्याचे युट्यूब चैनल असले पाहिजे दहा जणांना नोकरी देण्याची क्षमता त्याने ठेवली पाहिजे नेत्यांनी पत्रकारांना अडीअडचणीत राजाश्रय व संरक्षण देण्याची गरज आहे असे  आवाहन त्यांनी शेवटी  उपस्थित पत्रकारांना केले.
पत्रकार दिनाच्या पत्रकारांना शुभेच्छा देताना आमदार आशुतोष काळे
यावेळी आ. आशुतोष काळे म्हणाले, सामाजिक राजकीय जीवनामध्ये काम करत असताना या क्षेत्रामध्ये  मला काही फार वेळ नाही झालेला पण जे काही माझं कार्य आहे ते आपल्या सर्वांच्या समोर आहे 2014 ला पराभूत झाल्यानंतर जे काही समाजाचे प्रश्न आपल्याकडून जाणून घेतले यात सर्वांचे मार्गदर्शन मिळालं जिथे कुठे अन्याय होतोय किंवा काही चुकीचं घडतंय ते आपल्याकडून माहिती झाल्यानंतर त्याच्यावर आंदोलन करण्याची भूमिका किंवा त्याच्यावर  काहीतरी करण्याचं काहीतरी भूमिका घेऊन तो प्रश्न कसा मार्गी लागेल यासाठी प्रयत्न माझे होते आणि आपण देखील ती भूमिका लोकांपर्यंत पोहोचण्याच आपल्या माध्यमातून काम केलं म्हणून खऱ्या अर्थाने 2019 ला निवडणुकीला सामोरे जात असताना जे काही पाच वर्षांमध्ये केलं त्या आपण लोकांपर्यंत पोहोचवल्या त्याच्यामुळे थोड्या मताने का होईना मला विजय मिळाला 1924 काळामध्ये सुदैवाने सत्ताधारी पक्षामध्ये काम करण्याची संधी मिळाली काही काळविरोधी पक्षांमध्ये काम करण्याची संधी मिळाली जे काही काम मी केलं त्यात राज्याचे उपमुख्यमंत्री  अजित पवारांच्या माध्यमातून जेवढे काही काम करता आलं निधी आणता आलं याची देखील माहिती आपण लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आणि म्हणून 2024 ची निवडणूक अतिशय मोठ्या मताधिक्याने मला जिंकता आली व या सर्व काळामध्ये आपल्या सर्वांचे सहकार्य त्या ठिकाणी राहिले कर्मवीर शंकरराव काळे  माजी आमदार अशोकराव काळे  यांच्या काळापासून ही आपली परंपरा आहे  ज्या पद्धतीचे प्रेम त्यांच्यावर राहील व आपल्या पूर्ण उद्योगवर राहील त्याच्यापेक्षा जास्त प्रेम माझ्यावर तुम्ही केलेले इथून पुढे देखील ते प्रेम असंच राहावं अशा प्रकारची विनंती त्यांनी यावेळी पत्रकारांना शेवटी केली   मनापासून स्वागत करतो ग्रामीण भागातून आलेला एक करून थोडे उच्च पदावर गेले आहे आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचा मनापासून अभिनंदन करतो आपल्या सर्वांना आजच्या पत्रकार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आपण जे काही सहकार्य मागच्या काळात ते 2024 ला सर्वांचे म्हणून सव्वा लाखाचा मताधिक्य मिळालेले तर असच सहकार्य पुढच्या काळामध्ये राहू द्या एवढीच विनंती या ठिकाणी करतो महायुतीचे सरकार आता भक्कम पणाने आलेले काही चिंता करायचं आता परत काही विरोधी पक्षात जायचं काही कारण नाही पाच वर्षे आपले सत्ताधारी पक्षामध्ये आपण आहोत जास्तीत जास्त आपल्याला काम करायचे आपल्याला जे काही अडचणी करा मी पाहिलं तर तीन महिन्यानंतर जो जनता दरबार झाला त्याच्यामध्ये सर्वात पहिली संधी तुम्हाला बोलायला दिली एक तीन महिन्यांमध्ये थोडसं ठीक आहे आता इलेक्शनचा काळ असतो रेगुलर कामकाज सोडून फक्त इलेक्शन वर फोकस करावा लागतो आणि नंतर इलेक्शन नंतर सरकार स्थापन व्हायला थोडासा विलंब झाला त्याच्यामुळे अधिकाऱ्यांचा थोडासा होऊन चालणार नाही हे आपण जनता दरबार मध्ये दिलेला आहे तरी पण आपल्याकडे कुठल्याही जरी गोष्टी किती का छोटा असेल आपण माझ्यापर्यंत पोहोचून त्या मला कशा सोडवता येतील हा माझा प्रामाणिक प्रयत्न मागच्या काळात राहिलेल्या पुढे पण तसाच प्रयत्न असा असणारे मागच्या काळात आक्षे मतांनी आलो आता सव्वा लाखांनी आलो तर जबाबदारी निश्चितपणे फार मोठी वाढलेली त्याच्यामध्ये आपल्या सर्वांचे मदत लागणार आहे.
यावेळी  कर्मवीर काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष शंकरराव चव्हाण, सचिन चांदगुडे, राहुल रोहमारे, वाल्मिक कोळपे, बाजार समितीचे माजी सभापती सुरेश जाधव आदीसह कर्मवीर शंकरराव काळे उद्योग समूहाचे सर्व पदाधिकारी व संचालक कोपरगाव पत्रकार उपस्थित होते  सूत्रसंचालन  गोरक्षनाथ चव्हाण यांनी  तर शेवटी  आभार कारखान्याचे उपाध्यक्ष शंकरराव चव्हाण यांनी मानले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page