राष्ट्र सक्षम होण्यासाठी युवा पिढ्या घडविणे ही खरी ताकद – राज्यपाल हरिभाऊ बागडे

राष्ट्र सक्षम होण्यासाठी युवा पिढ्या घडविणे ही खरी ताकद – राज्यपाल हरिभाऊ बागडे

The real strength is to create young generations to empower the nation – Governor Haribhau Bagde

राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊनाना बागडे यांची कोल्हे यांच्या निवासस्थानी भेट

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! ,Tue 21 Jan 25  18.30 pm.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव : आपला देश प्रगतीच्या दिशेने अधिक वेगाने पुढे जाण्यासाठी नव्या पिढीला उभारी देण्याची गरज आहे.एक पिढी आपले कार्य आणि कर्तृत्व पूर्ण करत असताना दुसऱ्या पिढीला तयार करणे हे देखील गरजेचे आहे अन्यथा सक्षमता कशी येणार असे मत माझे आहे.आज स्व.कोल्हे साहेब असते तर त्यांनी देखील हीच मांडणी केली असती कारण राष्ट्र घडविण्यासाठी सामूहिक शक्तीची गरज असल्याचे प्रतिपादन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी कोपरगाव येथे केले

कोल्हे निवासस्थानी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी उपस्थित राहून हितगुज साधले. यावेळी कौटुंबिक संवाद साधला.
कोपरगाव दौऱ्यावर असताना राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी येसगाव येथे कोल्हे निवासस्थानी भेट देत कोल्हे कुटुंबाच्या शुभेच्छा स्वीकारल्या. माजी मंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांच्याशी असणाऱ्या जुन्या आठवणी आणि ऋनानुबंध यांना उजाळा या निमित्ताने मिळाला.बिपीनदादा कोल्हे,नितीनदादा कोल्हे,स्नेहलता कोल्हे, अमित कोल्हे,युवानेते विवेक कोल्हे आदींसह कोल्हे कुटुंबातील सदस्यांनी हरिभाऊ बागडे यांचे स्वागत केले.
श्री बागडे पुढे म्हणाले कोल्हे कुटुंबाने राजकीय सामाजिक क्षेत्रात केलेले काम उल्लेखनीय आहे.विधानसभा निवडणुकीत त्यांनी मोठ्या मनाने वरिष्ठ नेत्यांच्या शब्दाला सन्मान दिला आणि एका अर्थाने राजधर्म जपला हे दखल घेण्यासारखे आहे. आपल्याला काही मिळावे या पेक्षा काही मिळो अथवा ना मिळो आपण देशाला काय योगदान देऊ शकतो याचा विचार करणारे लोक आयुष्यात पुढे जातात असे मत व्यक्त केले. स्व.शंकरराव कोल्हे यांच्याशी सहकाराबद्दल मुलाखत घेण्याचा योग आला होता तेव्हापासून अनेकदा वैचारिक आदान प्रदान झाले.आता अगदी तिसऱ्या पिढीचेही चांगले सामाजिक योगदान सुरू आहे त्याबद्दल कौतुक केले.
स्नेहलता कोल्हे म्हणाल्या की राजस्थान सारख्या मोठ्या राज्याचे राज्यपाल म्हणून कार्य करत आहात याचा आम्हाला अभिमान आहे.स्व.शंकरराव कोल्हे यांच्या पासून आपण जपलेले ऋणानुबंध तिसऱ्या पिढीतही घट्ट आहेत. ज्येष्ठ मार्गदर्शकांचे प्रेरणा आणि आशीर्वाद नेहमी एक नवीन ताकद देतात असे प्रतिपादन केले. 
आभार व्यक्त करताना विवेक कोल्हे म्हणाले हरिभाऊ नाना बागडे यांच्याकडे आपण ज्येष्ठ पिढीतील एक ऊर्जावान मार्गदर्शक म्हणून आम्ही पाहतो.अतिशय अभ्यासपूर्ण विचार आणि ऊर्जा आपण आम्हाला काम करण्यासाठी देत आहात त्यामुळे येणाऱ्या पंचवीस तीस वर्षे एक दिशा कार्यरत राहण्यासाठी मिळाली असल्याच्या भावना व्यक्त केल्या.

Leave a Reply

You cannot copy content of this page