दूध उत्पादनात भारत जगात प्रथम क्रमांकावर – राज्यपाल हरिभाऊ बागडे
India ranks first in the world in milk production – Governor Haribhau Bagde
मदर डेअरीचा उद्योग शिर्डीत सुरू करण्याचा मानस – पालकमंत्री विखे पाटील
पश्चिम वाहिनी नद्यांचे ६५ टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्यासाठी जलसंपदा विभागाचे
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! ,Mon 20 Jan 25 15.30 pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव: दूध उत्पादक व वितरकांनी दूध भेसळ होणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे. दूध व्यवसाय हा शेतकऱ्याच्या हिताचा असल्याने तो टिकला पाहिजे. दूध उत्पादनात भारत जगात प्रथम क्रमांकावर आहे, असे प्रतिपादन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केले.
राज्यपाल बागडे म्हणाले, केवळ नफा मिळविणे हे सहकाराचे ध्येय नसून समाजाचा आणि सभासदांचा उत्कर्ष हा सहकाराचा खरा उद्देश आहे, दूध उत्पादक व सभासद हा खरा दूध संघाचा मालक असतो, दूधसंघात उत्पन्न व खर्च याचा ताळमेळ बसला पाहिजे. उत्पन्नापेक्षा खर्च कमी पाहिजे, तरच सहकारी संस्था नफ्यात राहतील.असेही त्यांनी सांगितले
प्रास्ताविकात दूध संघाचे चेअरमन राजेश परजणे यांनी स्व. नामदेवराव परजणे यांनी दूध संघाचे लावलेेले रोपटे आज वटवृक्ष झाल्याचे सांगीतले. सुवर्ण महोत्सवी वर्षात संघ पदार्पण करीत असताना अनेक अत्याधुनिक बदल घटत असल्याचे ते म्हणाले.
कोपरगाव तालुक्यातील सहजानंदनगर येथील गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेडच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त विविध प्रकल्पांचा व कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या नवीन घरकुलांच्या बांधकामांच्या पायाभरणीचा शुभारंभ राज्यपाल श्री.बागडे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार रमेश बोरनारे, आमदार विठ्ठलराव लंघे, आमदार काशिनाथ दाते, आमदार अमोल खताळ, माजी खासदार डॉ.सुजय विखे पाटील, गोदावरी खोरे नामदेवराव परजणे तालुका दूध उत्पादक संघाचे चेअरमन राजेश परजणे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, कृष्णराव परजणे, काकासाहेब कोयटे, विजयराव वहाडणे, मच्छिंद्र टेके, राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाचे कार्यकारी अधिकारी हत्तेकर, उपविभागीय अधिकारी मानिक आहेर, उपविभागीय पोलिस अधिकारी शिरीष वमने आदी उपस्थित होते.
आदी उपस्थित होते.
राज्यपाल बागडे म्हणाले, चांगल्या भावनेने सहकार क्षेत्रात काम केल्यास संस्थांना तोटा होत नाही, तोटा झाला तरी त्याची भरपाई अधिक क्षमता वापरून करता येते. देशात सहकार क्षेत्रातील विविध उद्योग मागील ६० वर्षांपासून यशस्वीपणे चालू आहेत.

मदर डेअरीचा उद्योग शिर्डीत सुरू करण्याचा मानस – पालकमंत्री विखे पाटील
पालकमंत्री राधाकृष्ण.विखे पाटील म्हणाले, एखादी संस्था सहकारात पन्नास वर्ष पूर्ण करत आहे, ही घटना सहकाराबद्दल लोकांचा विश्वास अधिक दृढ करणारी आहे. गायींच्या निकृष्ट दर्जाच्या बीजावर बंदी घालणारा कायदा राज्य शासनाने आणल्याने येत्या काळात गायींच्या संख्येत वाढू होऊन दूध उत्पादन क्षमता वाढणार आहे. राज्यात सर्वाधिक ५३ लाख लीटर दूध उत्पादन अहिल्यानगर जिल्ह्यात होत आहे. मदर डेअरीचा प्रकल्प शिर्डी औद्योगिक वसाहतीत सुरू करण्याचा मानस असल्याचे ही त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात दूधाचे उत्पादन वाढल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची संख्या कमी झाली आहे. राज्यशासनाने शेतकऱ्यांना सात अश्वशक्ती पर्यंत वीज मोफत दिली आहे. पश्चिम वाहिनी नद्यांचे ६५ टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्यासाठी जलसंपदा विभागाचे प्रथम प्राधान्य असणार असल्याचेही पालकमंत्री श्री.विखे पाटील यांनी सांगितले.

याप्रसंगी राज्यपालांच्या हस्ते १.५ मेगावॅट (डी.सी.) क्षमतेचा सौरउर्जा प्रकल्प, दूध शुद्धीकरण मशीन, सतत खवा बनविणारी मशीन, पाणी शुद्धीकरण यंत्रणा आणि पाणी साठवण टँक या प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले.याप्रसंगी राज्यपालांच्या हस्ते संवत्सर ग्रामपंचायतीच्या घरकुल प्रकल्पांसाठी शेती महामंडळाच्या जागेचा उताराग्रामपंचायतीला वाटप करण्यात आला.
सूत्रसंचालन राजश्री पिंगळे यांनी केले तर विवेक परजणे यांनी आभार मानले.

चौकट
चांगला दूध संघ, चांगले उपपदार्थ गोदावरी दूध संघाने तयार केले, त्याला मार्केट मिळविले आहे. हे वैभव पाहून आमचे डोके गरगरू नये म्हणून मला फेटा बांधला असल्याची मिश्कील टिपन्नी श्री बागडे यांनी केली. संघाच्या वाढत्या व्यापाला शुभेच्छा त्यांनी दिल्या.
Post Views:
180





