अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या चिमुकल्याचा खून, आईसह प्रियकर अटकेत.
Murder of a child who was an obstacle in an immoral relationship, mother and lover arrested.
कोपरगाव पोलिसांची दमदार कामगिरी सव्वा महिन्याच्या अथक प्रयत्नानंतर आरोपींना पकडले
कोपरगाव : अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या साडेचार वर्षाच्या मुलाला मारून त्याचे प्रेत चासनळी येथील नदीपात्रात टाकून देण्यात आले होते. याप्रकरणी मयत चिमुकल्याच्या आईसह प्रियकराला अटक करण्यात आली. असल्याची माहिती शिर्डी पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने यांनी रविवारी (9) दुपारी तालुका पोलीस स्टेशन मध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली यावेळी तालुका पोलीस निरीक्षक संदीप कोळी हेही उपस्थित होते.

यावेळी अधिक माहिती देताना पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने म्हणाले, सदर गुन्हयाचे तपासात पोलीस निरीक्षक संदीप कोळी वेगवेगळ्या पथकासहतपासात असताना चासनळी परीसरातील सी सी टी व्ही फुटेजची पाहणी व तांत्रिक निरीक्षणावरून सदर मयत मुलाचे प्रेत आणुन टाकणारे व्यक्ती मुलाची आई व प्रियकर असल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर गेल्या सव्वा महिन्यापासून पोलीस फरार झालेल्या आरोपींचा शोध घेत होते शनिवारी 8 फेब्रुवारी रोजी मुलाची आई शितल बदादे ही दिंडोरी येथे असल्याचे समजल्याने पोलीस पथकाने जाऊन तिला अटक केली तीस ताब्यात घेऊन तिचा प्रियकर सागर शिवाजी वाघ याचे ठावठिकाण्यावावत माहिती घेतली असता तीने तो भऊर ता.देवळा जि. नाशिक येथे असल्याची माहिती मिळाल्याने त्याचा सदर भागात जाऊन रात्रभर प्रयत्न केल्यानंतर रविवारी सकाळी 9 फेब्रुवारी रोजी त्याला ताब्यात घेतले त्यांना विश्वासात घेऊन विचारपुस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली असुन प्रेमात अडसर नको म्हणुन सदर मुलाचा खुन केल्याचे दिसून येते असे त्यांनी सांगितले.
याप्रकरणी खबर देणार पोलीस पाटील प्रकाश रामनाथ शिंदे (वय 53) पोलीस पाटील राहणार चासनळी यांनी याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वैद्यकीय अधिकाऱ्याच्या अहवालावरून मुलाच्या डोक्यात मारून त्याचा खून करून पुरावा नष्ट करण्याचे हेतूने नदीपात्र टाकून दिल्याचे निष्यण्ण झाल्याने पोसई कमलाकर दिनकर चौधरी यांनी अज्ञात इसमांविरुध्द फिर्याद दिलेवरुन गुरनं ४०२/२०२४ भारतीय न्याय संहिता सन २०२३ चे कलम १०३(१), २३८ प्रमाणे दि. २२ डिसेंबर २४ रोजी दाखल करण्यात आलेला होता.
याप्रकरणी कार्तिकची आई शितल ज्ञानेश्वर बदादे व शितलचा प्रियकर सागर शिवाजी वाघ यांना अटक करण्यात आली. याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी ही राकेश ओला, पोलीस अधीक्षक अहमदनगर, अप्पर पोलीस अधिक्षक वैभव कल्लुवर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी विभाग शिरीष वमने यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी, पोलीस उपनिरीक्षक वैशाली मुकणे, पो उप निरीक्षक कमलाकर चौधरी, पोहेकॉ/६३३ संदीप देवराम बोटे ,पोहेकॉ/१२२ मधुसूदन भानुदास दहिफळे, पोकॉ/नवनाथ गुंजाळ, पोकॉ/रमेश झडे, पोकॉ/राजु शेख ,पोहेकॉ/१२२ मधुसूदन भानुदास दहिफळे, पोकॉ/नवनाथ गुंजाळ, पोकॉ/रमेश झडे, पोकॉ/राजु शेख,पोकॉ/नवाळी, पोकॉ/खुळे, पोकॉ/ किसन सानप, व अप्पर पोलीस अधिक्षक सो श्रीरामपुर यांचे कार्यालयाकडील पोकॉ/सचिन धनाड यांचे पथकाने केली असुन सदर गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळी हे स्वतः करीत आहेत.